बीडमध्ये 9, केजमध्ये 5, गेवराईत 4, पाटोदा, परळी, अंबाजोगाईत प्रत्येकी 2 रुग्ण
बीड | वार्ताहर
बीड जिल्ह्यात आज सोमवारी (दि.20) सकाळी आणखी 24 कोरोना बाधीत रुग्ण निष्पन्न झाले आहेत. बीडमध्ये सर्वाधिक 9 तर केज तालुक्यात 5, गेवराईत 4 रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय पाटोदा, परळी, अंबाजोगाईत प्रत्येकी 2 रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आता एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 354 झाली आहे. पैकी 174 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 142 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
बाधीत रुग्णांमध्ये बीडमधील २५ वर्षीय पुरुष ( रा.लोहार गल्ली , जुना बाजार बीड ) ४० वर्षीय पुरुष ( रा.जुना बाजार कोरडे गणपती मंदीर , बीड ) ५८ वर्षीय पुरुष ( रा.जुना बाजार , हाफीज गल्ली , कादरीया मस्जीद जवळ ) ३२ वर्षीय पुरुष ( रा . लक्ष्मण नगर , लेंडी रोड , बीड ) १८ वर्षीय महिला ( रा कारंजा रोड खंदक , बीड पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ५४ वर्षीय पुरुष ( रा कागदी दरवाजा बीड ) ४३ वर्षीय पुरुष ( रा बीड शहर राहण्याच्या ठिकाणाची खात्री करणे सुरु आहे ) ४३ वर्षीय महिला ( रा.कबाड गल्ली , जुने शहर पोलीस स्टेशन जवळ ) ३१ वर्षीय पुरुष ( रा.पोलीस कॉलनी , बशीरगंज , बीड )
गेवराई तालुक्यातील ३४ वर्षीय पुरुष ( रा.मालेगाव ता.गेवराई , ) २० वर्षीय पुरुष ( रा , उमापुर ता गेवराई , आरोपी ) ६५ वर्षीय महिला ( रा.गजानन नगर , गेवराई ) ३२ वर्षीय महिला ( रा.माळी गल्ली , गेवराई )
पाटोदा तालुक्यातील २७ वर्षीय पुरुष ( रा.करंजवण ता.पाटोदा ) ३८ वर्षीय पुरुष (रा. काकडहिरा ता .पाटोदा )
केज तालुक्यातील ६५ वर्षीय पुरुष ( रा.कळमअंबा ता केज , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ३९ वर्षीय पुरुष ( रा , होळ ता केज , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) १८ वर्षीय पुरुष ( रा होळ ता.केज , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २ ९ वर्षीय पुरुष ( रा होळ ता केज , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ३० वर्षीय पुरुष ( रा.आनंदनगर केज पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत )
परळी ;- ०२ वर्षीय पुरुष ( रा इंद्रानगर परळी , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ६६ वर्षीय महिला ( रा , जिरेवाडी ता.परळी )
अंबाजोगाई 02 -३८ वर्षीय महिला ( रा.बागवान गल्ली , अंबाजोगाई ) ३५ वर्षीय महिला ( रा.सदर बाजार , अंबाजोगाई , बार्शीहुन आलेली ) - यांचा समावेश आहे.
Leave a comment