बीड | वार्ताहर
गेवराई तालुक्यातील केकतपांगरी येथील एका वृद्ध कोरोना बाधीत रुग्णाचा आज रविवारी दुपारी बीड जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांच्या मृत्यूची संख्या आता 14 झाली आहे.
केकतपांगरी येथील एका वृद्धाचा स्वॅब तपासल्यानंतर त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता.संबंधित रुग्णावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते.आज रविवारी सकाळी या रुग्णाची प्रकृती बिघडली, त्यातच दुपारी त्यांचा मृत्यू झाला.दरम्यान आज पहाटेच औरंगाबाद येथे खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या बीडमधील एका तरुणाचा मृत्यू झाला ,त्यानंतर काही तासात बीडमध्ये उपचार घेणाऱ्या वृद्ध रुग्णाचाही मृत्यू झाल्याने जिल्ह्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक होत चालली असल्याचे स्पष्ट होत आहे.
Leave a comment