बीड | वार्ताहर

 

बीड जिल्ह्यात शनिवारी (दि.18) पहाटे आणखी 11 रुग्ण कोरोना बाधीत रुग्ण निष्पन्न झाले आहेत. परळीत 5, बीडमध्ये 3 तर गेवराई तालुक्यात 2 आणि केज तालुक्यात 1 रुग्णाचा समावेश आहे.

 

 

जिल्ह्यातून अंबाजोगाई येथील प्रयोगशाळेत तपासणीला पाठवलेल्या स्वॅबपैकी 11 रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. बाधीत रुग्णांमध्ये 27 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय महिला ( दोघे रा.माऊली कॉलनी, संत नामदेव नगर, बीड) 19 वर्षीय पुरुष (खासगी रुग्णालयातील कर्मचारी), 27 वर्षीय पुरुष ( रा. वीर लहुजीनगर ता.गेवराई) येथील खासगी रुग्णालयातील कर्मचारी), 60  वर्षीय पुरुष (रा.केकतपांगरी ता.गेवराई), 55 वर्षीय पुरुष (रा.होळ, ता.केज) तसेच परळी शहरातील रा.जुने रेल्वेस्टेशन येथील 15 वर्षीय मुलगा, 35 वर्षीय पुरुष व 35 वर्षीय महिला, आणि  सर्व्हेश्वरनगर परळी येथील 18 वर्षीय पुरुष व 25 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

एकूण रुग्णसंख्या 316

161 रुग्णांवर उपचार सुरू

बीड जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 316 झाली आहे. पैकी 143 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता 161 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.