बारावी बोर्ड परीक्षेत कु .मानसी भंडारी कु .समृद्धी खिंवसरा पहील्या
बीड । वार्ताहर
बीड शहरातील गुरुकुल इंग्लिश स्कूलचा दहावी आणि बारावी सीबीएसईचा बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन यावर्षीही गुरुकुलने आपली गुणवत्ता जोपासली असुन कु .समृद्धी खिंवसरा हीने दहावीत 97.20% एवढे गुण मिळवत शाळेतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली तर बारावी बोर्ड परीक्षेत कु .मानसी भंडारी हीने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला . संस्थेचे दोन्ही परीक्षेतील यश अधोरेखित करणारे असुन गुरुकुलची ही गुणवत्ता कायम ठेवण्यात आम्ही यशस्वी झालो असल्याचे संस्थेचे कार्यकारी संचालक अखिलेश ढाकणे यांनी यावेळी सांगितले .
गुरुकुल इंग्लीश स्कूलने यंदा ही सीबीएसई बोर्ड परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवले असुन .आपली यशाची परंपरा कायम ठेवली आहे . दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही सर्वाधिक मुली गुणवत्तेत पुढे आहेत .कु .समृद्धी खिंवसरा हीने दहावी बोर्ड परीक्षेत 97.20 % गुण प्राप्त करून शाळेतून आणि मुलीत पहीली येण्याचा मान पटकावला आहे .कु . खुशी राठोड आणि चि .तेजस खोसे 95.80 यांनी समान गुण घेत द्वितीय , तर शेख सफिन 95.40 % तृतीय क्रमांकावर उत्तीर्ण झाली आहे .तसेच पहील्या दहा मध्ये चि .श्रीनाथ गोल्हार 95% ,खुशी खिंवसरा 94.80 % ,कु .समृद्धी लोढा 94 .40% ,चि राज थापडे 94.20% ,नेतल सारडा 94 % ,श्रुती देशमाने 93.60 % कु .ऐश्वर्या शेळके 93.20 %
प्रेरणा तांबे 93.20 यांनीही आपली गुणवत्ता सिद्ध केली असुन 118 पैकी 117 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत . तर
बीड शहरातील गुरुकुल कॉलेज हे जिल्ह्यातील पहिले सीबीएसई कॉलेज असुन बारावी बोर्ड परीक्षेचा हा पहिलाच निकाल हा संस्थेचा लौकिक उंचावणारा आहे . या परीक्षेत एकुण ३० विद्यार्थी सहभागी झाले होते . पैकी २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत . कु .मानसी भंडारी हिने ८९. २ % गुण मिळवत प्रथम श्रेणीने जिल्ह्यात पहीली आली .तर कु .संस्कृती बोरा हिने ८८ .८ % गुण घेत दुसरे स्थान मिळवले , चि .किरण मस्के आणि कु .वैष्णवी तिवारी यांनी ८७ .४% गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला .तसेच अनुक्रमे कु. निकिता सूरडकर ८७% , उमेर शेख ८५.६% , रिझा अली सय्यद ८५.२ % , चि .अभिषेक गुंजे ८१% ,कु .वैष्णवी निंबाळकर ८०%,कु .आयशा मोमीन ९०% ,कु .नंदिनी जाजू ७९ % हे विद्यार्थी पहिल्या दहा मध्ये आले आहेत . संस्थेच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे मार्गदर्शक डॉ .नारायणराव ढाकणे , सचिव डॉ .राजेंद्र ढाकणे , अध्यक्षा डॉ .सौ .विनिता ढाकणे , कार्यकारी संचालक अखिलेश ढाकणे , प्राचार्य .बी .एस .तकीक , मनोज सर्वज्ञ आणि सर्व प्राध्यापक यांनी अभिनंदन केले आहे .
Leave a comment