गेवराई शहरात माऊली नगर आणि मोटे गल्ली येथे

कंटेनमेंट झोन घोषित अनिश्चित कालावधीसाठी संचारबंदी लागू

 बीड  । वार्ताहर

गेवराई शहरात माऊली नगर आणि मोटे गल्ली येथे कंटेनमेंट झोन आदेश लागू करणेबाबत येथे कोरोना विषाणूची लागण covid 19 positive झालेले रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे काही भागात कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली असून फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे, असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत.
 
 याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या भागात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. 

गेवराई शहरात माऊली नगर मधील  वसंत लेंडगुळे यांचे घरापासून  ते  डॉ बाबासाहेब चाळक  यांच्या घरापर्यंत  या भागात आणि मोटे गल्ली मधील दत्ता लेंडगुळे यांचे घरापासून ते प्रेम मोटे यांच्या घरापर्यंतच्या भागात कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच या दोन्ही ठिकाणी अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येऊन संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

  राज्य शासनाने लॉक डाऊन कालावधी 31 जुलै 2020 पर्यंत वाढविला असल्याने त्या अनुषंगाने जिल्ह्यात दिनांक 31 जुलै 2020 रोजीच्या रात्री 12 पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम 144 (1) (3) लागू करण्यात आले आहेत. सदर आदेश या आदेशासह अंमलात राहणार आहेत.

 आष्टी शहरातील संभाजीनगर आणि केज तालुक्यातील नांदूरघाट येथे

कंटेनमेंट झोन घोषित अनिश्चित कालावधीसाठी संचारबंदी लागू

आष्टी शहरातील संभाजीनगर येथे  १ रुग्ण आणि केज तालुक्यातील नांदूरघाट येथे २ रुग्ण कोरोना विषाणूची लागण (covid 19 positive) झालेले रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे काही भागात कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली असून फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे, असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत.
 
 याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या भागात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. 

आष्टी शहरातील संभाजीनगर,  धोंडे पेट्रोल पंपाच्या पाठीमागे या परिसरात कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. 

तसेच केज तालुक्यातील नांदूरघाट येथे कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. 

या दोन्ही ठिकाणी अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येऊन संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

  राज्य शासनाने लॉक डाऊन कालावधी 31 जुलै 2020 पर्यंत वाढविला असल्याने त्या अनुषंगाने जिल्ह्यात दिनांक 31 जुलै 2020 रोजीच्या रात्री 12 पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम 144 (1) (3) लागू करण्यात आले आहेत. सदर आदेश या आदेशासह अंमलात राहणार आहेत.

नांदुर घाट कंटेनमेंट झोनमध्ये

नांदुर घाट येथे दोन कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर नांदुर घाट येथे कंटेनमेंट झोन लागले आहे.  जिल्हाधिकारी साहेब यांच्या सूचनेनुसार कलम 144 दंडात्मक कारवाई देखील केली जाऊ शकते त्यामुळे नांदुर घाट कडेकोट बंद या पार्श्वभूमीवर केज तहसीलदार दुलाजी मेंडके पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी नांदुर घाट ला भेट दिली सरपंचांना भेटून गाव बंदच्या सूचना देखील दिल्या जनतेला आव्हान करण्यात आले की आपल्या परिवाराची आपली काळजी घ्या प्रशासनाला सहकार्य करा घराच्या बाहेर पडू नका तहसीलदार यांच्या सूचनेनुसार नांदुर घाट ला जोडले जाणारे रस्ते पूर्ण अडवण्यात आले आहेत

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.