बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात बुधवारी आढळून आलेल्या 19 रुग्णांमध्ये बीड शहरातील नवजीवन हॉस्पीटलमध्ये ऍडमिट असलेल्या एका रुग्णांचा समावेश आहे तर तीनजण हे हॉस्पिटलमधील कर्मचारी आहेत,आणि एक जण हा ऍडमिट असलेला शहरातील रुग्ण आहे.यातील चार जण हे बीड शहरातील असून गेवराईचा एक रुग्ण हा देखील याच रुग्णालयात उपचार घेताना पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
बीड शहरातील नवजीवन रुग्णालयात उमापूर येथील एका 54 वर्षीय व्यक्तीवर चार दिवस उपचार सुरू होते. त्यानंतर या रुग्णाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तो पॉझिटिव्ह आढळून आला होता.त्यानंतर या रुग्णालयातील इतर रुग्णांचे उपचार घेणार्या इतर रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले होते.यामध्ये तीन जण हे हॉस्पिटलमधील कर्मचारी आहेत. एक रुग्ण बीडचा आहे तर एक रुग्ण गेवराईचा आहे. जो या ठिकाणी उपचार घेत होता.
यातील पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून यात चार जण हे बीड शहरातील आहेत तर एक रुग्ण हा गेवराई तालुक्यातील आहे .हॉस्पिटलच्या चुकीमुळे तब्बल पाच जण बाधित झाले असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या हॉस्पिटलमध्ये जो उमापूरचा रुग्ण दाखल झाला होता,त्याच्या संपर्कात आलेला एक डॉक्टर, एक स्टाफ मेम्बर,एक सिक्युरिटी गार्ड अन अन्य एक जण रुग्ण जो येथे ऍडमिट होता तो असे पाच जण पॉझिटिव्ह आले आहेत.
Leave a comment