ग्रामीण पोलीस ठाण्यासह पोलीस वसाहत हादरली

माजलगाव । वार्ताहर

तालुक्यातील जदिद जवळा येथील विवाहित महिलेस लग्नाचे आमिष दाखवून विवाहित पुरुषाने बलात्कार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात आरोपीविरुध्द गत आठवड्यात गुन्हा दाखल झालेला आहे. दरम्यान आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे. हा आरोपी कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. परदेशी यांनी दिली. आता प्रकरणातील या प्रकरणातील पीडित फिर्यादी महिलेस स्वॅब तपासण्यासाठी आरोग्य विभागात आणले आहे. आरोपी कोरोना बाधीत निष्पन्न झाल्याने ग्रामीण पोलीस ठाण्यासह पोलीस वसाहत हादरली आहे.

घनसावंगी (जि.जालना) येथून आलेली 52 वर्षीय विवाहित महिला मागील आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर शहरातील जुना मोंढा कंटेंटमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.त्यानंतर आज बुधवारी दुपारी जदीद जवळा येथील बलात्कार प्रकरणातील आरोपी पॉझिटिव्ह आला आहे. सदर आरोपीस 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. या आरोपीचा न्यायालय तसेच पोलीस ठाणे ग्रामीण येथे संपर्क आलेला आहे.आरोपीच्या संपर्कात आलेल्या सर्व कर्मचारी वर्गाचे स्वब घेतले जाण्याची शक्यता असून पोलीस वसाहत तसेच ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क येणार्‍यांनी सावधानता बाळगून काळजी घेणे आवश्यक आहे.

नातेवाईक देवू लागले सोशल मीडियावरुन माहिती

मागील 24 तासात कोरोना तपासणीसाठी पाठवलेल्या स्वॅबचे रिपोर्ट अद्यापपर्यंत प्रशासनकडून जाहीर करण्यात आलेले नाहीत.त्यामुळे जिल्ह्यात विविध अफवाचे पेव फुटले आहे. दुसरीकडे प्रशासनाकडून जाहीर होण्यापूर्वीच काही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे नातेवाईकच सोशल मीडियाच्या माध्यमातून नावासह पद जाहीर करून नातेवाईकांना कोरोना झाले असल्याचे प्रसारित करत असल्यामुळे जिल्ह्यात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.

यशवंत हॉस्पिटल 24 तास बंद

गेवराई तालुक्यातील 1 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाला असून तपासणी करीत येथील यशवंत हॉस्पिटलमध्ये सोमवारी येऊन गेला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने 24 तासाकरिता हॉस्पिटल बंद ठेवण्याचे आदेश दिल्याचे डॉ. यशवंतराजेभोसले यांनी दैनिक लोकप्रश्‍नशी बोलताना सागितले 

जदिद जवळा येथे पूर्णवेळ संचारबंदी

माजलगाव तालुक्यातील जदिद जवळा येथे एक कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न झाला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जदिद जवळा या गाव कंटेटमेंट झोन घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणी आता पुढील अनिश्‍चीत कालावधीसाठी पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अप्पर जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.