स्वॅब घेतलेल्या अन्य दोघांचाही मृत्यू
बीड | वार्ताहर
बीड शहरातील थिगळे गल्लीनजीकच्या औटी गल्लीतील रहिवाशी 78 वर्षीय कोरोना बाधीत रुग्णाचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी (दि.14) सकाळी मृत्यू झाला.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी ही माहिती दिली. याशिवाय एका 48 वर्षीय व्यक्तीचा जिल्हा रुग्णालयात तर केजला स्वॅब घेतलेल्या अन्य एका तरुणाचाही आज पहाटे अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला; त्याचा रिपोर्ट आज प्राप्त होणार आहे.
बीड जिल्ह्यात सध्या 296 स्वॅब रिपोर्टची प्रतीक्षा आहे. आज हे रिपोर्ट प्राप्त होऊ शकतात. बीडला उपचार घेणाऱ्या एका वृद्ध रुग्णाचा सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 12 झाली आहे,दरम्यान श्वास घेण्यास त्रास होत असल्याने सोमवारी रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या अन्य एका 48 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.या व्यक्तीचा स्वॅब घेण्यात आला असून आज सायंकाळी त्याचा रिपोर्ट प्राप्त होणार आहे.
नांदूरघाटच्या तरूणाचा अंबाजोगाईत मृत्यू
अंबाजोगाई:- केजच्या रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित ३२ वर्षीय तरूणाचा मंगळवारी पहाटे अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. नांदूरघाट (ता.केज) येथील तरूणाला प्रकृती अस्वास्थ्यामुळे केजच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने सोमवारी दुपारी त्याचा स्वॅब घेण्यात आला होता.रात्री उशीरा तो अत्यावस्थ झाल्याने त्याला राञी १२.३० वाजता अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयात हलविण्यात आले.तिथे अवघ्या तासाभरातच त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.या तरूणाच्या स्वॅबचा रिपोर्ट मंगळवारी येण्याची शक्यता आहे अशी माहिती मिळत आहे.
Leave a comment