कालचेही 128 अहवाल प्रलंबित
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यातून आज सोमवारी आणखी 168 स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. दरम्यान कालचे 128 अहवालही प्रलंबित आहेत. त्यामुळे आता एकुण 296 अहवालांची जिल्ह्याला प्रतीक्षा आहे. मागील चार दिवसात जिल्ह्यात तब्बल 47 कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न झाल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे.
सोमवारी (दि.13) सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालय बीड 23,कोव्हीड केअर सेंटर बीड 81,ग्रामीण रुग्णालय आष्टी 23, ग्रामीण रुग्णालय माजलगाव 8,उपजिल्हा रुग्णालय गेवराई 13,उपजिल्हा रुग्णालय केज 2,कोव्हीड केअर सेंटर अंबाजोगाई 11 आणि स्वाराती ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथून 7 स्वॅबचा समावेश आहे.
Leave a comment