किराणा दुकानांची प्रभाग, कॉलनीनिहाय यादी प्रसिद्ध
बीड । वार्ताहर
बीड शहरातील कन्टेनमेंट झोनक्षेत्रातील लोकांना किराणा सामानाची घरपोच सेवा देण्याच्या अनुषंगाने किरणा दुकानाची त्यांच्यासाठी नेमेलेल्या प्रभाग, कॉलनी, गल्ली निहाय ज्या संबधित नेमेलेल्या दुकांनाचे नाव,पत्ता मोबाईल क्रमांक च दुकानावर नियुक्त कर्मचारी यांचे नाव व मोबाईल क्रमांक निहाय यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत
नागरिकांनी केवळ अंत्यत आवश्यक किराणा सामान जसे की, (तेल,गहू,साखर इ.) वस्तूंची मागणी त्यांच्यासाठी नेमेलेल्या किराणा दुकानदार यांचेकडेच नोंदवावी. संबधित दुकानावर मागणी नोंदविल्यानंतर दुसर्या दिवशी सकाळी 9 ते दु 12 वा.पर्यंत सामानाची घरपोच डिलेव्हरी नियुक्त कर्मचारी यांचे मार्फत करण्यात येईल अशा सूचना संबधित कर्मचारी व दुकानदार यांना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी दुकानदारांशी बिलांविषयी चर्चा करावी मगच मागणी नोंदवावी. दुकानदारांकडे ऑनलाईन सुविधा असेल तर त्याचा वापर करूनच व्यवहार करावा,अन्यथा कर्मचारी घरी सामान देण्यासाठी आल्यावर त्यांच्याकडे समक्ष रक्कम स्वत:एका पॉकिटात भरावी व दयावी. दुकानदारांनी सदरील रक्कम काळजीपूर्वक हाताळावी. सर्वांनी चेहर्यांवर मास्करुमाल बांधावा,सॅनीटायझर, साबणाचा वांरवार वापर करावा सामाजिक अंतर राखावे आणि कोवीड विषयक सर्व खबरदारी घ्यावी. दुकानदारांनी सामानाचे दर जास्त आकारल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल.
ज्या नागरिकांचा त्यांच्या प्रभागातील दुकानदारांशी संपर्क होणार नाही.त्यांनी खालील कर्मचारी यांचेशी त्यांच्या प्रभाग क्रमांकाप्रमाणे संपर्क साधावा.रुपकांत जोगदंड प्रभाग (क्र.9,10,11) मो.क्र.8830948594, महादेव गायकवाड प्रभाग (क्र.7 मो.क्र.8446767615,भागवत जाधव प्रभाग (क्र.12,13,22,24) मो.क्र.9767489388,भारत चांदणे प्रभाग (क्र.4) मो.क्र.9130918628, प्रशांत ओव्हाळ प्रभाग (क्र.15) मो.क्र.7020543654, राजू वंजारे प्रभाग (क्र.20,21) मो.क्र. 9370767476,नागरिकांनी निडली अॅपचा वापर त्यांचे प्रभागातील दुकानदारंशी चर्चा करून करावा. सदरील पवर नागरिकांनी साहित्याचे दर देखील पाहता येतील.
अधिकृत विक्रेत्यांनाच भाजीपाला विकता येणार;
दुधविक्रेत्यांना सकाळी नऊपर्यंत प्रवेश
भाजीपाल्याच्या अधिकृत विक्रेत्यांमार्फत घरपोच भाजीपाला विक्री कन्टेनमेंट झोनमध्ये करता येईल. तसेच दुधवाल्यांना सकाळी 9वाजेपर्यंत कन्टेनमेंट झोनमध्ये प्रवेश असेल आणि हॉस्पीटल मधील (शासकीय व खाजगी) कर्मचारी ज्यांचे निवासस्थान कन्टेनमेंट झोन मध्ये आहे.त्यांना कन्टेनमेंट झोन बाहेर येण्याची परवानगी असेल इतर कोणालाही परवानगी असणार नाही.
Leave a comment