बीडमध्येही नव्याने चार रुग्ण
चौसाळ्यातील बाधित रुग्णाच्या संपर्कातील तिघांना लागण
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच आहे. शनिवार आणि रविवारचे 628 अहवाल प्रलंबित होते. त्यातील 195 अहवाल प्राप्त झाले असून यातील 9 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले तर 184 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान आता 433 अहवालांची प्रतिक्षा कायम आहे.
बाधित रुग्णांमध्ये चौसाळा (ता.बीड) येथील यापूर्वीच्या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कातील 35 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय मुलगा व 37 वर्षीय महिला रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बीड शहरातील संत तुकारामनगर येथील यापूर्वीच्या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या सहवासित 37 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय रानुमाता मंदिराच्या मागे, शाहूनगर,बीड येथील 40 वर्षीय पुरुष, तुळजाईनगर, बीड येथील यापूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील 52 वर्षीय पुरुष, तसेच अक्षय प्लाझा, व्यंकटेश शाळेच्या जवळ, भक्ती कंन्स्ट्रक्शन येथील 46 वर्षीय पुरुषाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. शिरुकासार तालुक्यातील तागडगाव येथील 45 वर्षीय पुरुष तसेच आष्टी येथील दत्तमंदिर गल्लीतील 42 वर्षीय पुरुषाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. रविवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास हे अहवाल जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाले.
आता 104 रुग्णांवर उपचार सुरू
आता बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 236 झाली असून यापैकी 121 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 11 झाली आहे. सद्यस्थितीत 104 बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Leave a comment