प्रलंबित 431 अहवाल सायंकाळपर्यंत येणार
आज नव्याने 542 अहवाल पाठवले;90 रुग्णांवर उपचार सुुरु
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात मागील दोन दिवसात तब्बल 4 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात कोरोनाची धास्ती वाढली आहे. शुक्रवारी येवलवाडी (ता.पाटोदा) आणि शनिवारी बेनसूर (ता.पाटोदा) येथील 2 रुग्णांचा पुणे येथे उपचारादरम्यान तर उमापूर (ता.गेवराई) येथील एका रुग्णाचा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झालेला असताना आज रविवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास बीड शहरातील किला मैदान परिसरातील 75 वर्षीय महिलेचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.दरम्यान यातील येवलवाडी,बेनसूर व उमापूरच्या रुग्णांना अगोदरच कॅन्सर, न्यूमोनिया व इतर आजार होते. त्यात कोरोनाची भर पडली होत. दरम्यान आता कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 11 झाली आहे.
आता बीड जिल्ह्यात एकुण कोरोना बाधितांची संख्या 222 वर पोहचली आहे.यापैकी कोरोनामुक्त घेवून घरी परतलेल्या व्यक्तींची एकुण संख्या 121 झाली आहे. शुक्रवारी येवलवाडी (ता.पाटोदा) आणि शनिवारी बेनसूर (ता.पाटोदा) येथील 2 रुग्णांचा पुणे येथे उपचारादरम्यान तर उमापूर (ता.गेवराई) येथील एका रुग्णाचा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. या तिन्ही रुग्णांना अगोदरच कॅन्सर, न्यूमोनिया व इतर आजार होते. त्यात कोरोनाची भर पडली होती,असे असतानाच रविवारी पहाटे बीड शहरातील किला मैदान परिसरातील 75 वर्षीय महिलेचा जिल्हा रुग्णालयातील कोव्हीड केअर सेंटरमध्ये मृत्यू झाला. त्यामुळे आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा 11 वर पोहचला आहे. शनिवारी 9 बाधीत रुग्ण निष्पन्न झाल्याने सद्यस्थितीत उपचार सुरु असलेल्या एकुण बाधित रुग्णांची संख्या 90 झाली आहे.
दरम्यान बीड जिल्ह्यातील शनिवारी तपासणीसाठी गेलेल्या 717 पैकी 286 अहवाल रात्री प्राप्त झाले होते. त्यातील 431 अहवाल प्रलंबित असून हे रिपोर्ट रविवारी (दि.12) सायंकाळपर्यंत प्राप्त होणार आहेत. असे असतानाच आज रविवारी सकाळी जिल्ह्यातून आणखी 542 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यात जिल्हा सामान्य रुग्णालय बीड 19,कोव्हीड केअर सेंटर बीड 90,ग्रामीण रुग्णालय आष्टी 39,ग्रामीण रुग्णालय माजलगाव 13,उपजिल्हा रुग्णालय गेवराई 29,उपजिल्हा रुग्णालय केज 5, उपजिल्हा रुग्णालय परळी 340,कोव्हीड केअर सेंटर अंबाजोगाई 4 आणि स्वाराती महाविद्यालय अंबाजोगाई येथील 3 स्वॅबचा समावेश आहे. शनिवारी बीड जिल्ह्यातून सर्वाधिक 717 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यापैकी 286 स्वॅबचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले असून त्यामध्ये 9 पॉझिटिव्ह, 269 निगेटिव्ह आले आहेत तर 431 अहवाल प्रलंबित आहेत ते रिपोर्ट आज रविवारी सायंकाळपर्यंत आरोग्य विभागाला प्राप्त होणार आहेत.
बीडमधील महिलेचा पहाटे मृत्यू
बीडमधील 75 वर्षीय महिलेचा अहवाल शनिवारी रात्री पॉझिटिव्ह आला होता.त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयाच्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु होते. दरम्यान रात्री त्यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना ऑक्सीजन लावले होते. मात्र पहाटे अडीचच्या सुमारास महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान महिलेच्या दफनविधीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी नगरपालिका, पोलीस प्रशासन यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
Leave a comment