बीड | वार्ताहर
बीड जिल्ह्यात शनिवारी आणखी 9 कोरोना बाधीत रुग्ण निष्पन्न झाले आहेत. यातील 6 जण बीड शहरातील आहेत तर अन्य 3 रुग्ण परळी, गेवराई आणि माजलगाव येथील आहेत.दरम्यान आता 94 जणांवर उपचार सुरू आहेत.
बाधीत रुग्णांमध्ये 32 वर्षीय महिला ( रा.कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ बीड , भिवंडीहुन आलेली), 75 वर्षीय महिला (मिल्लीया कॉलेज जवळ किल्ला मैदान बीड),56 वर्षीय पुरुष ( संभाजी नगर बालेपीर बीड ), 33 वर्षीय पुरुष (अजीजपुरा खंदक , पॉझिटिव्ह सहवासित ) ,28 वर्षीय पुरुष ( राजीव नगर, धानोरा रोड बीड ) आणि 30 वर्षीय पुरुष ( पांडे गल्ली, बालाजी मंदिर जवळ बीड ,पॉझिटिव्ह सहवासीत ) यांचा समावेश आहे. तर परळीत 65 वर्षीय पुरुष (आझाद नगर ,परळी, स्टेट बँक ऑफ इंडिया येथील पॉझिटिव्ह सहवासीत) , 24 वर्षीय पुरुष ( मोमीनपुरा , गेवराई . पॉझिटिव्ह सहवासीत ) आणि 52 वर्षीय महिला ( जुना मोंढा माजलगाव , सांगलीहुन आलेली ) यांचा समावेश आहे.
शनिवारी (दि.11) बीड जिल्ह्यातून सर्वाधिक 717 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई येथील प्रयो शाळेत पाठविण्यात आले होते. यापैकी 286 स्वॅबचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले असून त्यामध्ये 9 पॉझिटिव्ह , 269 निगेटिव्ह आले आहेत तर 431 अहवाल प्रलंबित आहेत.8 अहवाल अनिर्णित असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.दरम्यान शनिवारी भाटुंबा येथील 2 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आता 94 जणांवर उपचार सुरु
आता बीड जिल्ह्यात एकुण कोरोना बाधितांची संख्या 222 वर पोहचली आहे.यापैकी कोरोनामुक्त घेवून घरी परतलेल्या व्यक्तींची एकुण संख्या 121 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 7 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. शनिवारी 9 बाधीत रुग्ण निष्पन्न झाल्याने आता सद्यस्थितीत बीड जिल्ह्यासह औरंगाबाद, पुणे व मुंबई येथे उपचार सुरु असलेल्या एकुण बाधित रुग्णांची संख्या 94 झाली आहे.
Leave a comment