बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात शुक्रवारी पाठवलेल्या 292 पैकी 20 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निष्पन्न झाल्यानंतर आज शनिवारी तब्बल 717 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. यात सर्वाधिक 534 स्वॅब परळी तालुक्यातील व्यक्तींचे आहेत.आता या रिपोर्टकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
आज सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालय बीड 21,कोव्हीड केअर सेंटर बीड 42, ग्रामीण रुग्णालय आष्टी 6,ग्रामीण रुग्णालय माजलगाव 50,उपजिल्हा रुग्णालय गेवराई 21,उपजिल्हा रुग्णालय केज 5,उपजिल्हा रुग्णालय परळी 534, कोव्हीड केअर सेंटर अंबाजोगाई 37 आणि स्वाराती महाविद्यालय अंबाजोगाई येथून 1 व्यक्तीचा स्वॅब तपासणीला पाठवण्यात आला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात स्वॅब तपासणीला पाठवण्याची बीड जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे.
Leave a comment