माजलगाव । वार्ताहर
सोशल डिस्टन्सचे कोणतेच नियम न पाळता कोरोना आपत्कालीन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी व्यापारी महासंघाचे तालुकाध्यक्ष सुरेंद्र रेदासनीसह 5 व्यापार्यांवर पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत यांनी गुरुवारी (दि.9) गुन्हे दाखल केले. दोन दिवसातील ही दुसरी कारवाई आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही दुकानात गर्दी न करता अंतर राखून व मास्क लावून तसेचसॅनिटायझर वापरून व्यवसाय करायचा या सूचना देऊन जिल्हाधिकारी यांनी दुकाने सुरू करावयास परवानगी दिलेली आहे. असे, असताना शहरातील अनेक कापड दुकानात या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करून एकावेळेस 100-150 लोकांची गर्दी होत असते. याबाबत काही दुकानदार यांना यापूर्वी समज देऊन सोडून दिले होते. यानंतरही अनेक दुकानांत नियमांचे उल्लंघन होत असल्याने गुरुवारीसायंकाळी पोनि.बुधवंत, सहायक पोलिस निरीक्षक अविनाश राठोड,सहायक पोलिस उपनिरीक्षक सुभाष शेटे, खिझर पाशा, भास्कर राऊत, विनायक अंकुशे, दिलीप सरोदे यांच्यासह पथकाने व्यापारी महासंघाचे अध्यक्षसुरेंद्र रेदासनी यांच्या संजय ड्रेसेस, कुणाल ड्रेसेसचे रेकब मुदिया, समर्थ ड्रेसेसचे हनुमान शिंदे, जावेद तौफिक सिद्दीकी यांचे सैराट मोबाईल, दत्तात्रय गायकवाड यांचे पुना पावभाजी अशा पाच दुकानदारांवर गर्दी करून सोशल डिस्टन्सचे उल्लंघन केल्याप्रकरणी 188,269 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
व्यापारी महासंघाने पार्टी केली तेव्हाच सुटले
30 जून रोजी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांनी नवीन बसस्थानक समोरील अनिल भोजनालय येथे पार्टी केली. सुमारे 30-40 व्यापारी या पार्टीत एकत्र आले होते, त्यावेळीच कारवाई झाली असती तर व्यापार्यांचे धाडस वाढले नसते.व्यापारी महासंघाचे पदाधिकारीच सर्वात जास्त कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे.
Leave a comment