बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्याला बुधवारी (दि.8) आणखी 17 कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली आहे. महत्त्वाचे हे की, एकाच दिवशी इतके बाधीत रुग्ण आढळून येण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे.
बीड जिल्ह्यातून बुधवारी सकाळी एकूण 262 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले होते. यात जिल्हा सामान्य रुग्णालय बीड-16,स्वाराती ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई-8,उपजिल्हा रुग्णालय परळी-31, उपजिल्हा रुग्णालय केज-26,ग्रामीण रुग्णालय माजलगाव-22, उपजिल्हा रुग्णालय गेवराई -24, ग्रामीण रुग्णालय आष्टी -23,कोव्हीड केअर सेंटर बीड -80 आणि कोव्हीड केअर सेंटर अंबाजोगाई येथून -32 स्वॅबचा समावेश होता. यातील 17 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 238 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 7 अहवाल अनिर्णयीत आहेत. बाधितांमध्ये बीड तालुका - 6,परळी-6, अंबाजोगाई 3 आणि गेवराईतील 2 जणांचा समावेश आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.दरम्यान रुग्णांचा वाढता आकडा सर्वांची चिंता वाढवणारा ठरला आहे.
कोरोना बाधित रुग्ण या भागातील
बाधीत रूग्णांमध्ये अंबाजोगाई येथील 36 वर्षीय महिला आणि 15 व 13 वर्षीय मुलाचा समावेश आहे. हे तिघेही परळीतील एसबीआय कर्मचार्यांच्या कुटूंबीय असून ते अंबाजोगाई येथील शिक्षक कॉलनी मोरेवाडी येथील रहिवाशी आहेत.
परळीतही बुधवारी 6 कोरोना बाधित निषपन्न झाले आहेत. परळी शहरातील एसबीआयच्या 45 व 33 वर्षीय अशा दोन पुरुष कर्मचार्यांचा तसेच 71 वर्षीय पुरूषासह एसबीआय कर्मचार्यांच्या कुटूंबातील 7 वर्षीय मुलाचा समावेश आहे. याशिवाय परळी शहरातीलच एसबीआयच्या 46 वर्षीय व दादाहरी वडगाव येथील 23 वर्षीय पुरूष ग्राहकालाही कोरोनाची बाधा झाली आहे.
गेवराई येथील ईस्लामपुरा येथील यापूर्वीच्या कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेली 26 वर्षीय महिला आणि पुण्याहून केकतपांगरी (ता.गेवराई) येथे परतलेल्या 28 वर्षीय पुरूषाचा बाधित रुग्णात समावेश आहे.
बीड तालुक्यात बुधवारी एकूण 6 बाधित रूग्ण निष्पन्न झाले असून यातील 3 रूग्ण हे बीड शहरात केल्या गेलेल्या मेगा सर्वेतून निष्पन्न झाले आहेत. यात स्टेट बँक कॉलनी,परवाना नगर येथील 68 वर्षीय पुरूष, मोमीनपुरा,मक्का चौक येथील 43 वर्षीय पुरूष,विद्यानगर पूर्व येथील 30 वर्षीय महिला, गोविंदनगर येथील 83 वर्षीय महिला तसेच बीड तालुक्यातील साक्षाळपिंप्री येथील 55 वर्षीय पुरूष व वंजारवाडी येथील 30 वर्षीय पुरूषाचा कोरोना पॉझिटिव्ह रूग्णात समावेश आहे.
पाच जणांना डिस्चार्ज; 62 जणांवर उपचार सुरु
बीड जिल्ह्यात एकुण कोरोना बाधितांची संख्या 170 पोहचली आहे. बुधवारी (दि.8) जिल्हा रुग्णालयातून 2 तर आष्टीतील 3 अशा एकुण 5 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, त्यामुळे आता कोरोनामुक्त घेवून घरी परतलेल्या व्यक्तींची एकुण संख्या 118 झाली आहे तर आजपर्यंत 7 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. बुधवारी 17 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता सद्यस्थितीत बीड जिल्ह्यासह औरंगाबाद, पुणे व मुंबई येथे उपचार सुरु असलेल्या एकुण बाधित रुग्णांची संख्या 62 झाली आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली.
Leave a comment