बीड | वार्ताहर
बीड जिल्ह्यात बुधवारी (दि.8) आणखी 17 कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली आहे. महत्त्वाचे हे की, एकाच दिवशी इतके बाधीत रुग्ण आढळून येण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे.
बीड जिल्ह्यातून बुधवारी सकाळी एकूण 262 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले होते. यातील 17 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 238 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 7 अहवाल अनिर्णयीत आहेत.
बाधितांमध्ये बीड तालुका - 6,परळी-6, अंबाजोगाई 3 आणि गेवराईतील 2 जणांचा समावेश आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.दरम्यान रुग्णांचा वाढता आकडा सर्वांची चिंता वाढवणारा ठरला आहे.
(सविस्तर बातमी लवकरच)
Leave a comment