सर्वसाधारण सेवेबरोबर अत्यावश्यक सेवा ही लाँकडाऊन करण्यात आल्या
यामध्ये दुध संकलनाचाही समावेश करण्यात आला
देवीनिमगावमध्ये कोरोनाचे दोन रुग्ण सापडताच दुग्ध व्यवसाय ठप्प
आष्टी । वार्ताहर
तालुक्यातील देवीनिमगाव येथे औरंगाबाद येथून आलेल्या दोन बालकांना कोरोना विषाणुचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट होताच जिल्हा प्रशासनाने पुर्ण गावात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागु केली.
या गावातील प्रमुख जगण्याचा व्यवसाय म्हणजे दुध धंदा होय. सर्वसाधारण सेवेबरोबर अत्यावश्यक सेवा ही लाँकडाऊन करण्यात आल्या.यामध्ये दुध संकलनाचाही समावेश करण्यात आला. बुधवार पासून दुध संकलन बंद असल्याने दुध घरीच राहत आहे.यामुळे लाख मोलाच दुध फेकून देण्याची वेळ शेतकर्यांवर येत आहे.
पाऊस वेळेवर पडत नसल्याने शेती परवडत नाही म्हणून शेतीला जोडधंदा म्हणुन दुग्ध व्यावसाय चालु केला. गत वर्षी दुधाला भावही वाढले. या व्यावसायात परवडत असल्याने एकाच पाहुन दुसर्याने पण दूध व्यवसाय चालु केला
परंतु कोरूना विषाणूचा संसर्ग वाढत राहिल्याने व औरंगाबाद येथून आलेल्या दोन मुलांना कोरोना झाल्याचे सिद्ध होतात प्रशासनाने गाव सेल केली असल्याने या ठिकाणची सर्व व्यवहार अनिश्चित काळासाठी बंद केले आहेत यामध्ये दूध केंद्र ही असल्याने शेतकरी वर्गावर मोठे संकट उभे राहिले आहे दूध डेअरी बंद असल्याने शेतकऱ्यांना दूध घरी ठेवावे लागत आहे या घरी ठेवलेल्या एवढ्या मोठ्या दुधाचे काय करायचे असा प्रश्न शेतकरीवर्ग समोर पडत असून दररोजचे हजारो रुपयांचे शेतकऱ्याचे नुकसान होत आहे यास जबाबदार कोण किंवा प्रशासन या दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करेल काय असा प्रश्न निरुत्तरीतच राहत आहे घरी शिल्लक राहिलेल्या दुधाचे काही शेतकरी शेजाऱ्यापाजाऱ्यांना मोफत वाटत करत आहेत तर काही शेतकरी खवा करून नातेवाईकांना मोफत वाटप करीत आहेत दूध संकलन बंद असले तरी गाई म्हशींना चारा पाणी करणे अनिवार्य असून त्यांच्या धारा काढून दूध पिळणे गरजेचे आहे रोजचे दुधाचे पैसे येण्याचे बंद झाले मात्र चारा पाण्याचा खर्च हा सुरूच असल्याने शेतकरी वर्गावर पुन्हा कोरोनाचे नवे संकट उभे राहिले आहे.
कड्यात पोलीस प्रशासन व सरपंच उतरले रस्त्यावर
खबरदारीचा उपाय म्हणून कडा तीन दिवस बंद
आष्टी तालुक्यातील देवीनिमगाव येथे दोन मुलांना कोराणाची बाधा झाल्याचे मंगळवारी स्पष्ट होताच कडा येथील संपूर्ण दुकाने तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देविनिमगाव व कडा या दोन गावांमधील अवघे अंतर अवघे तीन किलोमीटरचे असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शहर बंद करण्यात आले आहे.
आष्टी तालुक्यातील देवी निमगाव येथे दोन बालकांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट होतात कडा येथे खबरदारीचा उपाय म्हणून बुधवार , गुरुवार व शुक्रवार या तीन दिवशी संपूर्ण शहर बंद ठेवण्यात येणार आहे.देवी निमगाव ते कडा हे अंतर अवघे तीन किलोमीटर असून खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे शिवाय तोंडाला मास्क न बांधणे व विनाकारण फिरणाऱ्यावर कडा ग्रामपंचायतचे सरपंच अनिल ढोबळे व पोलीस प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे.विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये अथवा कडा व परिसरातील खेड्यापाड्यातील लोकांनी विना कामाचे कडा शहरात न येण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.
Leave a comment