परळीत पाच, बीड,अंबाजोगाईत प्रत्येकी तीन तर आष्टी तालुक्यातील दोघांचा समावेश 

बीड । वार्ताहर

बीड जिल्ह्याला कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. मंगळवारी (दि.7) जिल्ह्यात आणखी 13 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले आहेत. यात सर्वाधिक 5 बाधित रुग्ण परळीत तर बीड शहरात पुन्हा 3 बाधित रुग्ण निष्पन्न झाले आहेत. याशिवाय आष्टी तालुक्यातील देविनिमगाव येथे 2 आणि अंबाजोगाईतील 3 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकुण कोरोनाबाधितांचा आकडा आता 170 वर पोहचला आहे. 

बाधित रुग्णांमध्ये देविनिमगाव (ता.आष्टी) येथील 4 वर्षीय मुलगा व 8 वर्षीय मुलगी तसेच बीड शहरातील पांडे गल्ली (बालाजी मंदिर जवळ) 60 वर्षीय स्त्री, औटे गल्ली (थिगळे गल्ली जवळ) 78 वर्षींय पुरुष आणि बीड मामला येथील 63 वर्षीय पुरुष, परळी शहरातील 29, 20 व 25 वर्षीय पुरुष आणि 50 व 52 वर्षीय स्त्री तर अंबाजोगाईतील 38, 22 व 30 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. 

बीड जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा हळूहळू वाढत चालला आहे.शनिवारी 9, रविवारी 6, सोमवारी 3 तर मंगळवारी 13 अशी चार दिवसात एकुण 31 बाधीत रुग्णांची भर पडली आहे. शिवाय रविवारी पॉझिटिव्ह स्वॅब आलेल्या एका वृद्ध रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी जिल्ह्यातून  288 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब अंबाजोगाईतील प्रयोगशाळेत तपासणीला पाठवण्यात आले होते. यात  जिल्हा सामान्य रुग्णालय बीड-30, कोव्हीड केअर सेंटर बीड-76, स्वाराती महाविद्यालय अंबाजोगाई-1,कोव्हीड केअर सेंटर अंबाजोगाई येथून-42 उपजिल्हा रुग्णालय परळी-39,उपजिल्हा रुग्णालय केज-26,ग्रामीण रुग्णालय माजलगाव-24,उपजिल्हा रुग्णालय गेवराई-18 आणि ग्रामीण रुग्णालय आष्टी-32,अशा एकुण 288 स्वॅबचा समावेश होता. रात्री उशिरा हे सर्व अहवाल जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाले. यातील 13 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह तर 273 अहवाल निगेटिव्ह आले असून अन्य 2 अहवाल अनिर्णयीत आहेत. 

आता 50 रुग्णांवर उपचार सुरु 

मंगळवारी 13 बाधित रुग्णांची भर पडल्याने आता बीड जिल्ह्यात आजपर्यंतच्या एकुण बाधितांची संख्या  170 इतकी झाली आहे. पैकी 113 जण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत तर 7 जणांचा मृत्यू झाला असून आता तब्बल 50 जणांवर उपचार सुरु आहेत. 
 

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.