बीड । वार्ताहर
जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा हळूहळू वाढत चालला आहे.शनिवारी 9, रविवारी 6 तर सोमवारी 3 अशी तीन दिवसात एकुण 18 बाधीत रुग्णांची भर पडली आहे. शिवाय रविवारी पॉझिटिव्ह स्वॅब आलेल्या एका वृद्ध रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.असे असतानाच आज मंगळवारी (दि.7) जिल्ह्यातून आणखी 288 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब अंबाजोगाईतील प्रयोगशाळेत तपासणीला पाठवले आहेत.
यात जिल्हा सामान्य रुग्णालय बीड -30, कोव्हीड केअर सेंटर बीड-76, स्वाराती महाविद्यालय अंबाजोगाई-1,कोव्हीड केअर सेंटर अंबाजोगाई येथून-42 उपजिल्हा रुग्णालय परळी-39,उपजिल्हा रुग्णालय केज-26,ग्रामीण रुग्णालय माजलगाव-24,उपजिल्हा रुग्णालय गेवराई-18 आणि ग्रामीण रुग्णालय आष्टी-32,अशा एकुण 288 स्वॅबचा समावेश आहे. रात्रीपर्यंत सर्व अहवाल प्राप्त होतील अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली आहे.
37 जणांवर उपचार सुरु
बीड जिल्ह्यात आजपर्यंत एकुण बाधितांची संख्या ही 157 इतकी झाली आहे.पैकी 113 जण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत तर 7 जणांचा मृत्यू झाला असून आता 37 जणांवर उपचार सुरु आहेत. जिल्हा आरोग्य विभागाकडे मात्र आजपर्यंत 153 रुग्णांची नोंद आहे. अन्य 4 रुग्ण इतर जिल्ह्यात तपासले गेले होते.
Leave a comment