चुलत्याच्या फाशीला कारणीभूत
नेकनुर/वार्ताहर
शेतीतील शुल्लक वादावरून मारहाण झाल्याचा भावावर गुन्हा दाखल करण्यासाठी मुकादम सर्जेराव डोईफोडे, मुलगा राणा डोईफोडे यांनी सोमवारी पोलीस स्टेशन गाठले हीच तक्रार जिव्हारी लागल्यानंतर मंगळवारी सकाळी राणा डोईफोडे यांचे चुलते किसन डोईफोडे यांनी फाशी घेतल्याने मोठी खळबळ उडाली . राणा डोईफोडे यांच्यासह कुटुंबातील सदस्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी किसन डोईफोडे यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मागणी लावून धरत प्रेत ताब्यात घेण्यास नकार दिल्याने काही काळ डोईफोडवाडीत तणावाची परिस्थिती होती. पोलिसांनी पोस्टमार्टम नंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्याने परस्थिती निवळली.
पाली जिल्हा परिषद सर्कलचे सदस्य पती तथा डोईफोडवाडी चे सरपंच राणा डोईफोडे यांच्या वडिलांचे आणि चुलते किसन डोईफोडे यांच्यामध्ये काल शेतातील मोटारीच्या कारणावरून वाद झाला होता. मारहाणीची तक्रार देण्यासाठी राणा यांचे वडील सर्जेराव आणि कुटुंब पोलीस स्टेशन मध्ये सोमवारी आले होते त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी किसन डोईफोडे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांच्यावर कायदेशीर कारवाई केली. यानंतर किसन डोईफोडे वय ५२ यांनी मंगळवारी सकाळी घराजवळील लिंबाच्या झाडाला फाशी घेतली यामुळे संतप्त झालेल्या डोईफोडे यांच्या कुटुंबातील सदस्यांनी राणा डोईफोडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत प्रेत ताब्यात घेण्यास नकार दिला. एपीआय लक्ष्मण केंद्रे यांनी घटनास्थळी धाव घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी पोस्टमार्टम करण्यासाठी परवानगी दिली. किसन डोईफोडे यांचा मुलगा प्रदीप डोईफोडे यांच्या फिर्यादीवरून लाथाबुक्क्यांनी मारहाण, जीवे मारण्याची धमकी, तसेच सततच्या त्रासाने आत्महत्यास प्रवर्त केल्याचा गुन्हा सर्जेराव धोंडीबा डोईफोडे, राणा सर्जेराव डोईफोडे, कालिंदा सर्जेराव डोईफोडे, यांच्यासह दोन मुलाविरोधात कलम 306, 323, 504, 506,34 भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास एपीआय केंद्रे हे करीत आहेत.
Leave a comment