बीड | वार्ताहर
जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा हळूहळू वाढत चालला आहे.शनिवारी 9 तर काल रविवारी जिल्ह्यात 6 बाधीत रुग्णांची भर पडली आहे.शिवाय रविवारी पॉझिटिव्ह स्वॅब आलेल्या एका वृद्ध रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाल्याने त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. सोमवारी (दि.6) आरोग्य विभागाने आणखी 197 व्यक्तींचे स्वॅब तपासणीला पाठवले आहेत.
कोरोनाच्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील व्यक्तींचे थ्रोट स्वॅब अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात येतात. सोमवारी जिल्हा सामान्य रुग्णालय बीड -34,स्वाराती महाविद्यालय अंबाजोगाई-4, उपजिल्हा रुग्णालय परळी-38,
उपजिल्हा रुग्णालय केज-24,ग्रामीण रुग्णालय माजलगाव-8,उपजिल्हा रुग्णालय गेवराई -7,ग्रामीण रुग्णालय आष्टी -3, कोव्हीड केअर सेंटर बीड -44 आणि कोव्हीड केअर सेंटर अंबाजोगाई येथून 35 जणांच्या स्वॅबचा समावेश आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली आहे.
Leave a comment