बीड | वार्ताहर

परळी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील 5 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर परळी शहर लॉकडाऊन करण्यात आले आहे. शहरात येत्या 12 जुलैपर्यंत पूर्णवेळ संचारबंदी घोषित केली आहे. कोणालाही घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी हे आदेश जारी केले आहेत.

परळी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील 5 कर्मचाऱ्यांचे थ्रोट स्वॅब अहवाल शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.परळी शहर व परिसरामधील अनेक नागरिकांची या बँकेत मोठ्या प्रमाणात ये-जा झाली आहे त्यामुळे प्रतिबंधात्मक व्यवस्था करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने परळी शहर आठवडाभरासाठी पूर्ण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

यानुसार आता परळी शहरात या कालावधीत कोणालाही विशेष परवानगी शिवाय प्रवेश करता येणार नाही व शहराबाहेरही जाता येणार नाही. शहराबाहेर जाण्यासाठी व बाहेरून शहरात येण्यासाठी काढलेले सर्व पास रद्द करण्यात आले आहेत.या कालावधीत परळी शहरातील नागरिकांना बाहेर जिल्ह्यात व राज्यात जाण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पास मिळणार नाही परंतु मेडिकल इमर्जन्सीसाठी पास उपलब्ध होतील.परळी शहरात फक्त फिरत्या दूध विक्रेत्यांना परवानगी राहील.कोणत्याही दुकानामार्फत दूध विकता येणार नाही, अथवा दुकान उघडणार नाही. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासंदर्भात स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहेत.

परवानाधारक भाजी व फळ विक्रेत्यांना पूर्वीप्रमाणेच परवानगी राहील पण त्यांना घरोघरी जाऊन विक्री करावी लागेल. घरगुती गॅस पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गणवेश परिधान करावा,गणवेश नसलेल्यांनी नियमानुसार पास काढून सेवा द्यावी. वैद्यकीय कर्मचारी व औषधी विक्रेत्यांना दवाखाण्याचे ओळखपत्र किंवा ऑनलाईन पासद्वारे परळी शहरात प्रवासासाठी परवानगी आहे.परळीतील पोस्ट ऑफिस व बँका केवळ अंतर्गत महत्वाच्या कामकाजासाठी चालू राहतील, कोणत्याही ग्राहकाला प्रत्यक्ष सेवा देता येणार नाही.बँक व पोस्टाच्या कर्मचाऱ्यांना स्वतःचे ओळखपत्र वापरून शहरात प्रवास करत येणार आहे, मात्र टॉवर जवळील स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा परळी ग्रामीण पूर्णपणे बंद राहिल.परळी औष्णिक विद्युत केंद्र तसेच परळी शहर हद्दीतील गोदामे चालू ठेवण्यास जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे. धर्मापुरी रोडवरील इंडिया सिमेंट कारखान्यामधील कामगारांना उपविभागीय अधिकारी परळी यांच्या शिफारशीवरून कमीत कमी कामगारांच्या उपस्थितीत चालवण्यास परवानगी असेल असेही जिल्हाधिकारी यांनी आदेशात नमूद केले आहे.
 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.