भराडी । वार्ताहर

सिल्लोड येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन इद्रीस मुलतानी यांची भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदी निवड केली आहे. दि 3 रोजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी भाजपाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली त्यात इद्रीस मुलतानी यांची निवड झाली. मुलतानी यांच्या कारकिर्दीची सुरुवात तांडा बाजार ता. सिल्लोड ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदापासून झाली, या पदावर असताना जनसमान्यांशी असलेला जनसंपर्क वाढत गेला व भाजपाच्या नेतृत्वाने दिलेल्या जबाबदार्‍या यशस्वी सांभाळल्या, यानंतर भाजपा अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष, भाजपा जिल्हा चिटणीस, प्रदेश चिटणीस अल्पसंख्याक आघाडी, पंचायत समिती सदस्य सिल्लोड, जिल्हाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा, उपसभापती पंचायत समिती, आदी पदावर काम केलेले आहे, मुलतानी यांचे वडील पण भाजपाचे जुने व निष्ठावंत कार्यकर्ते होते त्यांच्या प्रेरणेने इद्रीस मुलतानी यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला व केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे अत्यंत विश्वासु म्हणूनच पक्ष संघटनेत ओळख निर्माण केली, प्रशासकीय कामांचा अनुभव व नियोजनाचा हातखंडा असल्याने अनेक निवडणूकीमध्ये नियोजनाची व प्रचाराची जबाबदारी यशस्वी पणे सांभाळली आहे.

सतत पक्षसंघटनेतील कामात अग्रेसर असणारे इद्रीस मुलतानी आज जिल्ह्याचा चेहरा म्हणून मराठवाड्यात व महाराष्ट्राच्या पक्ष संघटनेत उदयास येत आहे, अशा कर्तृत्व, नेतृत्व, आणि वक्तृत्वाने सजलेल्या निष्कलंक अश्या नेत्याला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदाची संधी दिल्याबद्दल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे, खासदार, डॉ भागवत कराड,आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार संतोष पाटील दानवे, आमदार प्रशांत बंब, जिल्हाध्यक्ष विजय औताडे, जेष्ठ नेते प्रभाकर पालोदकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर,भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे, गणेश लोखंडे, सुनील मिरकर दिलीप दाणेकर, मकरंद कोर्डे, अशोक गरुड, राजेंद्र जैस्वाल, श्रीरंग साळवे, पुष्पाताई काळे, गजानन राऊत, अरुण काळे,सुनील काळे, जयप्रकाश चव्हाण, शिवाजी बुढाळ, कैलास काळे, संजय डमाळे, कैलास जंजाळ,मनोज मोरल्लु, किरण पवार, कमलेश कटारिया,गणेश भूमकर, आदींनी अभिनंदन केले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.