केईएम हॉस्पिटलने माहिती दिल्यानंतर आरोग्य यंत्रणेची कार्यवाही

बीड | वार्ताहर

ब्राह्मणगाव (ता. गेवराई) येथील एकास कोरोना विषाणूची लागण  झाल्याने  ब्राह्मणगाव येथे कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे. फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

याबाबत केईएम हॉस्पिटल, मुंबईद्वारे माहिती प्राप्त झाली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी,बीड यांनी  अहवाल सादर केला आहे. त्यामुळे जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मौ. ब्राह्मणगाव ता. गेवराई येथे कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचारबंदी लागू करण्यात आली आहे .

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.