बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यातून आज शुक्रवारी (दि.3) सकाळी सर्वाधिक 188 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई येथील स्वाराती महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. रात्री उशिरापर्यंत हे अहवाल जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त होणार आहे.
यापूर्वी गुरुवारी जिल्ह्यात 4 कोरोनाबाधित रुग्ण निष्पन्न झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर उर्वरित 155 अहवाल निगेटिव्ह आल्याने बीडला दिलासा मिळाला आहे. असे असले तरी आज तबबल 188 व्यक्तींचे स्वॅब तपासणीला पाठवण्यात आले आहेत.
यात बीड जिल्हा सामान्य रुग्णालय 9,बीड कोव्हीड केअर सेंटर 54, आष्टी ग्रामीण रुग्णालय 16, केज उपजिल्हा रुग्णालय 34, परळी उपजिल्हा रुग्णालय 10, गेवराई उपजिल्हा रुग्णालय 13, माजलगाव ग्रामीण रुग्णालय 15, अंबाजोगाई स्वाराती महाविद्यालय 7, आणि अंबाजोगाई कोव्हीड केअर सेंटरमधून 30 व्यक्तींच्या स्वॅबचा समावेश आहे.
आता या अहवालांकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. बीडमध्ये बुधवारी कोरोनाचे 3 रुग्ण सापडल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक व्यवस्था म्हणून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशाने दोन दिवसांपासून बीड शहर कडकडीत बंद ठेवण्यात येत आहे. येत्या 9 जुलैपर्यंत बीड शहरात पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली असून अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आलेले आहेत. दरम्यान आजच्या अहवालांकडे सार्यांचे लक्ष लागून आहे.
Leave a comment