जीवनावश्यक किराण्याची घरपोहच 

सेवेसाठी प्रभाग, कॉलनीनिहाय दुकाने जाहीर 

 

बीड | वार्ताहर

 

शहरात ८ दिवसांसाठी ९ जुलै रोजी रात्री १२ वा पर्यंत संपूर्ण संचारबंदी घोषित करण्यात येवून कुणालाही घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. या कालावधीत जिवनावश्यक किराणा सामानाची घरपोच सेवा देण्याच्या अनुषंगाने प्रभाग व कॉलनीनिहाय दुकानांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तसेच शासकीय कार्यालय व न्यायालयाचे कामकाजाबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी निर्देश दिले आहेत.

 

 

बीड शहरातील जीवनावश्यक किराणा सामानाची घरपोहच सेवा देण्याच्या अनुषंगाने किराणा दुकानांची त्यांच्यासाठी नेमलेल्या प्रभाग, कॉलनी, गल्ली निहाय यादी ज्यात संबंधित नेमलेल्या दुकानांचे नांव, पत्ता, मोबाईल क्रमांक व दुकानावर नियुक्त कर्मचारी यांचे नांव मोबाईल क्रमांक निहाय यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 नागरिकांनी केवळ अत्यंत आवश्यक किराणा सामान जसे की, तेल, गहू, साखर, तांदूळ इत्यादी वस्तूंचीच मागणी त्यांच्यासाठी नेमलेल्या किराणा दुकानदार यांचेकडेच नोंदवावी. नागरिकांनी संबंधित दुकानदार यांच्याकडे अनावश्यक वस्तूची मागणी करु नये. 

संबंधित दुकानावर मागणी नोंदविल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकळी ९ ते दु. १२ वा पर्यंत सामानाची घरपोच डिलेव्हरी नियुक्त कर्मचारी यांचे मार्फत करण्यात येईल. दुकानदारांकडे Paytm, Googlepay किंवा ऑनलाईन सुविधा असेल तर त्याचा वापर करुनच व्यवहार करावा, अन्यथा कर्मचारी घरी सामान देण्यासाठी आल्यावर त्यांच्याकडे समक्ष रक्कम स्वत: एका पॉकीटात भरावी व दयावी. दुकानदारांनी सदरील रक्कम काळजीपूर्वक हाताळावी. सर्वांनी चेहऱ्यावर मास्क, रुमाल बांधावा, सॅनीटायझर,  साबणाचा वांरवार वापर करावा. सामाजिक अंतर राखावे आणि कोवीड विषयक सर्व खबरदारी घ्यावी. दुकानदारांनी सामानाचे दर जास्त आकारल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल. नागरिकांचा त्यांच्या प्रभागातील दुकानदारांशी संपर्क होणार नाही. त्यांनी प्रसिद्ध करण्यात आलेली यादीत समाविष्ट कर्मचारी यांचेशी त्यांच्या प्रभाग क्रमांकाप्रमाणे संपर्क साधावा.यासह नागरिकांनी Needly App चा वापर त्यांचे प्रभागातील दुकानदारांशी चर्चा करुनच करावा. सदरील अॅपवर नागरिकांना साहित्याचे दर देखील पाहता येतील.

 

 शासकीय कार्यालय व न्यायालयाच्या कामकाजाबाबत निर्देश 

 

बँकेचे कर्मचारी यांनी त्यांचे केवळ अंतर्गत व महत्त्वाच्या कार्यालयीन कामकाजासाठीच त्यांचे बँकेचे ओळखपत्र वापरुन कामकाज करणेस परवानगी देण्यात येत आहे. कोणत्याही ग्राहकाला त्यांनी प्रत्यक्ष सेवा देऊ नये. किरकोळ किराणा, घाऊक किराणा व्यापारी व कृषी घाऊक व्यापारी यांनी ऑनलाईन पास काढण्यासाठी त्यांनी अर्जासोबत शॉप अॅक्टची कॉपी/लायसन्स अपलोड करावे व पास प्राप्त झाल्यानंतर दुकान वरील प्रमाणे केवळ घरपोच सेवेसाठी चालू करण्यास परवानगी देण्यात येत आहे. कोणत्याही ग्राहकास या दुकानांवर येण्यासाठी संपूर्ण मनाई आहे. किरकोळ किराणा व्यापाऱ्यांना सकाळी ८.३० ते दु.१२.३० वा व घाऊक किराणा व्यापाऱ्यांना व घाऊक कृषी व्यापाऱ्यांना सकाळी ९ ते संध्याकाळी ४ वा. पर्यंत परवानगी पास द्वारेच देण्यात येईल.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी काढलेल्या आदेशा प्रमाणेच जिल्हा न्यायालयातील कार्यालयीन कर्मचारी यांना परवानगी असेल.जिल्हा कोषागार कार्यालय यांनी त्यांचे अंतर्गत व महत्वाच्या कार्यालयीन कामकाजासाठी त्यांचे कार्यालयाचे ओळखपत्र वापरुन कामकाज करणेस परवानगी देण्यात येत आहे.अंत्यविधीसाठी शासनाचे पत्रकात नमुद केलेनुसार नियमानुसार परवानगी असेल. पोस्ट ऑफीस राजुरी वेस आणि अधिक्षक पोस्ट ऑफिस बीड येथील कर्मचारी यांना ओळखपत्र वापरुन कामकाज करणेस परवानगी असेल. सर्व प्रकारची मालवाहतूक त्याअनुषंगाने बीड शहराच्या हद्दीतील गोदामे चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.