शाखा व्यवस्थापकासह , लिपिक , शिपाई रंगेहाथ पकडले
शिरुर कासार | वार्ताहर
येथील दि बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेतील तिघांना लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. गुरुवारी (दि.2) बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही मोठी कारवाई केली.दरम्यान शेतकऱ्यांची होणारी लूट आणि अडवणूक यामुळे समोर आली आहे.
शाखा व्यवस्थापक उद्धव जायभाये, लिपिक बाळू जायभाये आणि शिपाई राजेंद्र गुजर अशी रंगेहात पकडलेल्या तिघांची नावे आहेत. दि बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शिरूर शाखेतील अनुदान वाटपासाठी सहा हजारांची मागणी करण्यात आली होती.
याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त होताच गुरुवारी दुपारी बँकेतील शाखा व्यवस्थापक उद्धव जायभाये, लिपिक बाळू जायभाये, शिपाई राजेंद्र गुजर या तिघांना सहा हजाराची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे पाटील व त्यांच्या टिमने ही कारवाई केली आहे.
Leave a comment