बीड । वार्ताहर

कोरोनाचा समुह संसर्ग टाळण्यासाठी म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने बीड शहरातील 1 लाख 10 हजार लोकांचे दररोज 110 टिम मार्फत आरोग्य सर्वेक्षण केले जाणार असून बहुतांश लोकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर उरलेल्या घरांचे आणि लोकांचे सर्वेक्षणदेखील दोन दिवसात सुरु करण्यात येईल अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली. 

बीड शहरात बुधवारी कोरोनाबाधित तीन रुग्ण आढळून आले. यातील दोन रुग्ण हे कोणत्याही बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेले नाहीत. गेल्या तीन महिन्यांपासून हे दोघेही घराबाहेर पडलेले नाहीत. असे असतानाही ते पॉझिटिव्ह आल्याने समुह संसर्गाचा धोका वाढला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने अंगणवाडी सेविका,आशा वर्कर, बहुउद्देशीय कर्मचारी, शिक्षक आणि होमगार्ड यांच्या मदतीने तब्बल 110 पेक्षा जास्त पथके तयार करण्यात आली असून या पथकांमार्फत बीड शहरातील वेगवेगळ्या भागात 1 लाख 10 हजार 601 नागरिकांचे आरोेग्य सर्वेक्षण करण्यात येईल. त्याचबरोबरच ज्या व्यक्तींना सदी,खोकला,दमा, बीपी,शुगर, कर्करोग असे आजार असतील त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात येणार आहेत. बीड शहरात समुह संसर्गाचा धोका वाढल्यामुळे आरोग्य विभागाने घरोघर सर्वेक्षणाचा निर्णय घेतला असून उरलेल्या लाखभर लोकांचे सर्वेक्षणदेखील दोन दिवसात सुुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घरी तपासणीसाठी आलेल्या आरोग्य पथकाला सहकार्य करावे आणि आपल्या आसपास कोणी बाहेरगावाहून आले असल्यास त्याची माहिती आरोग्य कर्मचार्‍यांना द्यावी तसेच घरातच रहावे, शक्यतो घराबाहेर पडू नये असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

बीड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच होणारे मृत्यू टाळण्यासाठी आता जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने बीड शहरी भागात आरोग्य सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे.या सर्वेक्षणासाठी आरोग्य अधिकारी कर्मचार्‍यांची शेकडो कर्मचार्‍यांची टीम तयार करण्यात आली असून बीडमधील  पेठ बीड आणि मोमीनपुरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गतच्या विविध भागात घरोघरी जावून नागरिकांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. या उपकेंद्राअंतर्गतच्या विविध नागरि वसाहतीतील तब्बल 22 हजार 105 घरांमधील 1 लाख 10 हजार 601 लोकांची आरोग्या संदर्भात माहिती जाणुन घेतली जाणार आहे. यात  घरातील व्यक्तींमध्ये बीपी, शुगर, क्षयरोग, कॅन्सर असे आजार असतील तर त्याची नोंद इजी अ‍ॅपमध्ये घेतली जात आहे. तसेच कोव्हीडची लक्षणे आढळुन आल्यास तात्काळ डॉक्टरांना माहिती दिली जात आहे.

या बरोेबरच औरंगाबाद, पुणे, मुंबई, सोलापूर, नाशिक, नागपूर इत्यादी कोरोना व्हॉटस्पॉट भागातून बीड जिल्ह्यात आलेले व ज्यांचा बीडमधील वास्तव्य कालावधी 5 ते 14 दिवसांचा आहे अशा नागरिकांशी नोंद घेतली जात आहे. या बरोबरच अन्य माहितीही नोंदवली जात आहे. बीड शहरातील एमआयडीसी, पुरग्रस्त कॉलनी, पेठ बीड, सराफा लाईन, माळीवेस, धोंंडीपुरा, शाहुनगर, बालेपीर, जुना नगर नाका, पांगरी रोड, शिवाजीनगर, संत नामदेवनगर, पंशील नगर, गांधी नगर, मोहम्मदीया कॉलनी, मोमीनपुरा, बार्शी नाका, चंपावती नगर, धांडे गल्ली, खडकपुरा या नागरी आरोग्य उपकेंद्रांतर्गतच्या विविध भागात हे आरोग्य सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. सर्वेक्षणासाठी टीम सदस्य म्हणून एएनएम, आशा, शिक्षक, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा समावेश आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी दिली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.