बीड | वार्ताहर
बीड शहरात बुधवारी कोरोनाचे तीन बाधीत रुग्ण आढळून आल्यानंतर प्रतिबंधात्मक व्यवस्था म्हणून बीड शहर 9 जुलैपर्यंत बंद करण्यात आले आहे. या आदेशाची अंमलबजावणी सुरु झाली आहे.
असे असतानाच आज गुरुवारी (दि.2)सकाळी
बीड जिल्ह्यातून तब्बल 158 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. त्यामुळे कोरानाचे बीड जिल्ह्यावरील टेन्शन कायम आहे.
यात बीड जिल्हा रुग्णालयातून 47, बीड कोव्हीड केअर सेंटर 29, आष्टी ग्रामीण रुग्णालयातून 12, केज उपजिल्हा रुग्णालयातून 16, परळी उपजिल्हा रुग्णालयातून 7, गेवराई उपजिल्हा रुग्णालयातून 19, माजलगाव ग्रामीण रुग्णालयातून 3, अंबाजोगाईच्या स्वाराती महाविद्यालयातून 5 व कोव्हीड केअर सेंटर अंबाजोगाई येथून 20 व्यक्तींच्या स्वॅबचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
शहर आज कडकडीत बंद आहे. नागरिकांनी स्वत:हून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. सायंकाळपर्यंत सर्व स्वॅब रिपोर्ट जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त होणार आहेत
Leave a comment