54 पैकी 48 रिपोर्ट निगेटिव्ह
बीड | वार्ताहर
बीड शहराला बुधवारी (दि.1) धक्का बसला आहे. सकाळी तपासणीला पाठवलेेल्या 54 पैकी 3 रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यात दोन महिलांसह एका पुरुष रुग्णाचा समावेश असून तिघेही बाधीत रुग्ण बीड शहरातील रहिवासी आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
बीड शहरातील अजिजपुरा येथील 29 वर्षीय महिला, कारंजा रोड येथील 66 वर्षीय महिला आणि जुना बाजार येथील 48 वर्षीय पुरुष या तिघांचा बाधीत रुग्णात समावेश आहे.
बुधवारी सकाळी कोरोनाच्या निश्चित निदानासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय बीड 14, कोव्हीड केअर सेंटर बीड 9, ग्रामीण रुग्णालय आष्टी 12, उपजिल्हा रुग्णालय केज 2, उपजिल्हा रुग्णालय परळी 2, कोव्हीड केअर सेंटर अंबाजोगाई 10 आणि स्वाराती ग्रामीण महाविद्यालय अंबाजोगाई येथून 5 अशा एकूण 54 व्यक्तींच्या स्वॅबचा समावेश होता.यापैकी 3 जण बाधीत निष्पन्न झाले आहेत तर उर्वरित 48 अहवाल निगेटिव्ह आले असून 2 अहवाल रिजेक्ट करण्यात आले असून एक अहवालाचा कोणताही निष्कर्ष निघालेला नाही.
*चौघांना डिस्चार्ज; नऊ जणांवर उपचार सुरू*
बीड जिल्ह्यात आजपर्यंत बाधीत निष्पन्न झालेल्या रुग्णांची संख्या 127 झाली असून पैकी 107 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यात तिघांचा बीड जिल्ह्यात, दोघांचा औरंगाबादला
तर पुण्यात एकाचा मृत्यू झाला आहे.दरम्यान बुधवारी बीडमधून आणखी 4 जणांना डिस्चार्ज मिळाल्याने आता जिल्ह्यात 9 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली.
Leave a comment