कंपनी मालकासह तिघांविरुध्द गुन्हा

खत निरीक्षकांची गेवराई तालुक्यात मोठी कारवाई

चकलांबा । वार्ताहर

यंदा खरीपात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी पेरणीसाठी खते व बियाणे खरेदी करण्याच्या गडबडीत आहे. दुसरीकडे हीच संधी साधून काही खत कंपन्या बोगस खत वितरकांमार्फत बाजारात आणत असल्याचा प्रकार बीड जिल्ह्यात समोर आला आहे. मंगळवारी पौळाचीवाडी (ता.गेवराई) येथे एका ट्रकमधून तब्बल 12 टन बोगस खत जप्त करण्यात आले. खत निरीक्षक तथा गेवराईचे तालुका कृषी अधिकारी संजयकुमार ढाकणे यांनी हा बोगस खताचा प्रकार समोर आणला. या प्रकरणात कंपनीच्या मालकासह ट्रक घेवून चालक व क्लिनर यांच्याविरुध्द चकलांबा ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मेहलकुमार भगवान भाई गिनोए (31, रा.गुरुवार पेठ, पुणे) या खत कंपनी मालकासह ट्रक चालक संदिपान वैजनाथ खाडे व ऋषीकेश ज्ञानोबा खाडे (दोघे रा.वंजारवाडी ता.बीड) अशी आरोपींची नावे आहेत. मंगळवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास तालुका कृषी अधिकारी संजयकुमार ढाकणे यांना पौळाचीवाडी येथून एका ट्रकमधून क्र. (एम.एच. 12 एचडी 2494) बोगस खत आणले गेल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पौळाचीवाडी येथे जावून ट्रकमधील खताची तपासणी केली असता ते बोगस खत असल्याचे निष्पन्न झाले. 

रॉयल फर्टीकेम प्रा.लि. व महादप्लस फर्टीलयाझर प्रा.लि.( पतोली, अंकलेश्‍वर जि.भरोज,गुजरात) या वितरक कंपनीच्या ऑरगॅनिक मॅन्युअर व आरॅगनिक गॅ्रन्युअल्स न्यु पॅन्टो प्लस या खताच्या बॅग आढळून आल्या. याबाबत त्यांनी ट्रक चालक आणि क्लिनरकडे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी हा सारा माल गेवराईतून कुठे जात आहे याबाबत कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही. शिवाय त्याबाबतची सबळ कागदपत्रेही दाखवली नाहीत. त्यानंतर हा बोगस खताचा माल ट्रकसह चकलांबा ठाण्यात जमा केला गेला.संबंधितांनी खते नियंत्रण कायदा 1985 अन्वये  उत्पादकाकडून विक्रेत्याला दिला जाणारा ओ फॉर्म व इतर आवश्यक कागदपत्रांचा अभाव आढळून आल्याने ट्रकसह पुर्ण माल खते नियंत्रण आदेशच्या कलम 19 मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याने कलम ए सी नुसार बारा टन खताचा साठा जप्त करण्यात आले. सदरील खत विनापरवानगी विक्री करत असल्याने तसेच बॅगवर नमुद केलेले घटक हे रासायनिक खत नियंत्रण आदेशामधील अधिसुचित घटकापेक्षा भिन्न असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पंचनामा करुन रॉयल फर्टीकेम प्रा.लि. व महादप्लस फर्टीलयाझर प्रा.लि.( पतोली, अंकलेश्‍वर जि.भरोज,गुजरात) या कपंनीच्या मालकासह ट्रक चालक व क्लिनर यांच्याविरुध्द चकलांबा ठाण्यात कृषी अधिकारी संजयकुमार ढाकणे यांच्या फिर्यादीवरुन खत नियंत्रणे आदेश व अत्यावश्यक वस्तु कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. उपअधीक्षक स्वप्नील राठोड या प्रकरणाचा तपास करत आहेत. जप्त केलेल्या बोगस खताची किमंत तब्बल 12 लाख 75 हजार 800 रुपये इतकी आहे. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.