आज चौघांना मिळणार डिस्चार्ज
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यातून आज बुधवारी (दि.1) कोरोना तपासणीसाठी 54 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब अंबाजोगाई येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.दरम्यान आज आणखी 4 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली.
मंगळवारी जिल्ह्यातून तब्बल 108 जणांचे स्वॅब तपासले गेले होते. पैकी तब्बल 107 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. त्यानंतर आज पुन्हा 54 व्यक्तींचे स्वॅब तपासणीला पाठवण्यात आले आहेत. यात जिल्हा सामान्य रुग्णालय बीड 14, कोव्हीड केअर सेंटर, बीड 9, आष्टी ग्रामीण रुग्णालय 12, केज उपजिल्हा रुग्णालय 2, परळी उपजिल्हा रुग्णालय 2, कोव्हीड केअर सेंटर अंबाजोगाई 10 आणि स्वाराती महाविद्यालयातून 5 व्यक्तींच्या स्वॅबचा समावेश आहे. सायंकाळपर्यंत हे अहवाल प्राप्त होतील असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी सांगीतले.दरम्यान आजपर्यंत बीड जिल्ह्यात एकुण 124 कोरोना बाधीत रुग्ण निष्पन्न झाले. यातील 6 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 103 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले तर 10 जणांवर उपचार सुरु आहेत.यातील 4 जणांना आज बुधवारी डिस्जार्च दिला जाणार आहे. त्यामुळे आता केवळ 6 जणांवर जिल्ह्यात उपचार सुरु आहेत.
Leave a comment