अंबाजोगाई । वार्ताहर

मुळचा उस्मानाबाद जिल्ह्यातील गिरवली येथील रहिवासी असलेल्या एका 28 वर्षीय तरूणाचा अंबाजोगाईतील स्वाराती रूग्णालयात उपचार घेताना मंगळवारी (दि.30) मृत्यू झाला. त्याचा स्वॅब रिपोर्ट शुक्रवारी (दि.26) कोरोना पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान आता कोरोनामुळे जिल्ह्यात मृत्यू झालेल्या एकूण रूग्णांची संख्या 6 झाली आहे.

गिरवली (ता.भूम) येथील 28 वर्षीय तरूण ट्रॅक्टरचालक म्हणून काम करायचा. गेल्या काही दिवसापूर्वी तो अंबाजोगाई येथे राहणार्‍या त्याच्या भावाकडे आला होता. नंतर त्याला सर्दी व ताप आल्याने शहरातील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र तेथील डॉक्टरांना शंका आल्याने त्यांनी शासकीय रूग्णालयात जाण्याचे सांगितले. तिथे शुक्रवारी त्याचा स्वॅब कोरोना पॉझिटिव्ह आला होता. उपचार सुरू असताना स्वाराती रूग्णालयात मंगळवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला. दरम्यान अंबाजोगाईतील बोरूळ तलाव स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी सुधाकर जगताप यांनी दिली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.