बीड | वार्ताहर
जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे 5 बाधीत रुग्ण सापडल्यानंतर आज मंगळवारी (दि.30) सकाळी तब्बल 104 जणांचे स्वॅब तपासणीला अंबाजोगाई येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.
यात जिल्हा सामान्य रुग्णालय 20,बीड कोव्हीड केअर सेंटर 62, आष्टी ग्रामीण रुग्णालय 12, केज उपजिल्हा रुग्णालय 7, आणि अंबाजोगाईच्या स्वाराती ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयातून 3 व्यक्तींच्या स्वॅबचा समावेश आहे. दरम्यान या आठवड्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात स्वॅब तपासणीला गेले आहेत. आता या स्वॅब अहवालांकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Leave a comment