तिर्थपुरी-वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून शेतकऱ्यांना तीन कोटी रुपयाच पीक कर्जाचे वाटप केल्याची माहिती शाखा व्यवस्थापक एस आर ईरीचे दिली असून शासनाच्या महा विकास आघाडी सरकारच्या महात्मा फुले कर्ज मुक्ती योजनेअंतर्गत दोन लाख रुपये पर्यंत शेतकऱ्यांना पीक कर्जाची माफी दिलेल्या शेतकऱ्यांना तीर्थपुरी च्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या अंतर्गत दहा गावा तील 400 कर्जमुक्ती झालेल्या शेतकऱ्यांना तीन कोटी रुपये शेतकऱ्यांच्या थेट सेव्हिंग खात्यामध्ये जमा केली आहे शासनाने शेतकऱ्यांच्या कधी दुष्काळ कधी अतिवृष्टी असे अस्मानी-सुलतानी संकट शेतकऱ्यावर आल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच येत नसल्यामुळे महा विकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेमध्ये दोन लाख रुपये पर्यंत कर्जमाफी देण्यात आली या अनुषंगाने तीर्थपुरी च्या महाराष्ट्र ग्रामीण बँक अंतर्गत एकूण दहा गावे येत असून या दहा गावातील एक हजाराहून शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये बसविण्यात आले पैकी शासनाने शेतकऱ्यांना खरीप हंगाम बी बियाणे औषधे खते पेरणीसाठी शेतकरी अडचणीत आहे त्यांना पिक कर्ज तात्काळ वाटप व्हावी अशी आदेश येताच ग्रामीण बँकेने शेतकऱ्याची कर्ज मागणी 800 शेतकऱ्यांनी ऑनलाइन कर्ज मागणी केली यावर बँकेने कोणतीही अटी न घालता शेतकऱ्यांना 400 लाभार्थी खातेदारांना तीन कोटी रुपयाची पीक कर्जाची वाटप संबंधित शेतकऱ्याच्या सेव्हिंग खात्यात जमा केल्या मुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा पेरणीच्या तोंडावर मिळाला तसेच उर्वरित 400 लाभार्थी यांच्याही सेविंग खात्यात लवकरच रात्रंदिवस पीक कर्जाचे वाटप करण्यात येईल यासाठी बँकेचे उप व्यवस्थापक राजे सु लवार पीडी मा चे बाळू काळे आदीसह बँकेचे कर्मचारी पीक कर्जाचे वाटपासाठी परिश्रम घेत आहे. तसेच शासनाच्या आदेशानुसार महाराष्ट्र ग्रामीण बँकेने प्रथम पीक कर्जाची वाटप केल्यामुळे शेतकऱ्यांना बी बियाणे खरेदी साठी मार्केटमध्ये तात्काळ खरेदी करून पेरणीसाठी लगबग सुरू केली असून यामुळे शेतकऱ्या आनंद व्यक्त केला जात आहे
Leave a comment