तीन महिन्यांपासून दुकाने बंद : रोजगाराचा प्रश्न होतोय गंभीर

बीड । वार्ताहर

 ’लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांपासून पानटपरीचा व्यवसाय बंद असल्याने जनतेला पानाद्वारा चुना लावणार्‍या पान विक्रेत्यालाच चुना लागल्याचे चित्र आहे.

’खैके पान बनारस वाला, खुल जाये बंद अकल का ताला’ या डॉन चित्रपटातील लोकप्रिय गीत खूप गाजले होते. परंतु कोरोना मुळे झालेल्या लॉकडाऊनने पानवाला बाबूच्या दुकानाला तीन महिन्यांपासून टाळे लागले आहे.

रोजगार हिरावल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कमी गुंतवणुकीत रोजगार देणारा तसेच खूप काही कौशल्याची गरज नसणारा हा व्यवसाय अनेकांसाठी जगण्याचा आधार ठरला आहे. मोठ्या शहरासह लहान-मोठ्या गावातही पानटप?्या थाटून तिथे चहा, खर्रा, पान विकून त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता.

कधी कसे संकट ओढवले आणि आपले दुकान अघोषित काळासाठी बंद पडेल, असे त्यांनाही वाटले नव्हते. पहिली टाळेबंदी जाहीर झाली तेव्हापासून जवळपास तीन महिन्यांपासून चहा, खरा आणि पानाची दुकाने बंद आहेत. त्यामुळे उपजीविकेचे साधन हिरावल्याने हा व्यवसाय करणारे तसेच त्यावर अवलंबून असणार्‍या कुटुंबीयांची फरफट होत आहे.

लग्नसराईच्या हंगामात विविध प्रकारच्या पानांची मोठी मागणी असते. गावात लग्न, स्वागत समारंभ असले की अनेक जण आपली दुकाने मंडपाच्या बाहेर लावून बसतात. परंतु सध्या लग्नसुद्धा साध्या पद्धतीने होत आहे. त्यामुळे उत्पन्नाचे साधन दुरावले आहे. लॉकडाऊन या दुकानांना कुलूप असल्याने व्यावसायिकांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे.

अनेकांचे संसार रस्त्यावर

ग्रामीणसह शहरी भागात शेकडो कुटुंब चहा, पान दुकानावर अवलंबून आहेत. आज ना उद्या दुकाने उघडतील, अशी अपेक्षा होती. परंतु ती ती फोल ठरली. सर्वच प्रकारची दुकाने खुली करण्यास शासनाने परवानगी दिली. परंतु चहा, पानाच्या दुकानावर मात्र निर्बंध आहेत. परंतु रोजगार नसल्याने त्यांच्या कुटुंबाचे जीवन जगणे कठीण झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. इतर व्यवसायाप्रमाणे सामाजिक अंतर व सुरक्षात्मक साधनांचा वापर करून आम्हालासुद्धा दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पान विक्रेत्यांद्वारा होत आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.