बीड । वार्ताहर
कोरोनाच्या निश्चित निदानासाठी आज रविवारी (दि.28) सकाळी बीड जिल्ह्यातील 18 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई येथील प्रयोगशाळेत पाठवलेले सर्व निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.
जिल्ह्यातून रविवारी सकाळी एकूण 18 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. दुपारी सर्व अहवाल जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाले, ते सर्व निगेटिव्ह असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.मागील पाच दिवसातील सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने बीड जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आज दोघांना डिस्चार्ज
बीड जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 116 बाधितांपैकी 91 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आज रविवारी बीड जिल्हा रुग्णालयातील 2 रुग्ण कोरोनामुक्त होत असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोेक थोरात यांनी दिली.
Leave a comment