आष्टी : प्रतिनिधी
जिल्ह्यातील शेतकर्यांना यावेळेस पावसाने तारले पण कृृषी विभागाने व जिल्हाधिकारी यांनी मारले आहे.मागील महिन्यात जिल्हाधिकारी व पालकमंञ्याच्या बैठकीतच आपण सोयबीनचा तुटवड्याची माहिती सांगितली होती.पण पालकमंञी व जिल्हाधिकारी या प्रश्नाकडे सपशेल दुर्लेक्ष केल्याने आज शेतकर्यांनावर ही वेळ आली आहे. तसेच पिक कर्जासाठी जिल्हाधिकारी सांगतात एकही कागद ऑनलाईन व्यतीरिक्त लागत नाही,पण बॅका शेतकर्यांना कागदपञांसाठी पिळवणूक करीत असल्याचा असा घणाघाती आरोप माजी महसूल मंञी आ.सुरेश धस यांनी केला आहे.
ते आष्टी येथे आयोजित करण्यात आलेल्या पञकार परिषदेत बोलत होते.
यावेळी पुढे बोलतांना आ.धस म्हणाले,बीड जिल्ह्याची मागिल महिन्यात जिल्ह्याचे पालकमंञी व जिल्हाधिकारी यांनी बैठक घेतली होती.यावेळी सर्व जिल्ह्यातील आमदार बैठकीस उपस्थित होते.यावेळी मी व आ.प्रकाश सोळके आम्ही दोघांनी सोयाबीन पिका संदर्भात तक्रार केली होती.याचे प्रोसिडींगसुध्दा पहायला मिळेल,आज अशी परिस्थीती आहे की,पावसाने तारले व प्रशासनाने मारले आहे.तसेच जिल्हाधिकारी शेतकर्यांना कर्जासाठी एकही ऑनलाईन सोडता कागद लागणार नाही.पण बॅका शेतकर्यांना सिबील रिपोर्ट,मुल्याकंन, बेबाकी याची गरज नसतांनाही त्याची मागणी बॅका करतात त्यामुळे शेतकरी अडचणीत येतात.एक फाईल करण्यासाठी शेतकरी किमान दिड दोन हजार रुपये खर्चात भुरदंड होत आहे.त्यामुळे जिल्हाधिकारी यांचं बॅका ऐकत नाहीत का?असा सवालही आ.धस यांनी केला आहे.तसेच सरकारनेही शेतकर्यांविषयी चांगला निर्णय घेण्याची गरज आहे.परंतु त्यांचे वरवरचे निर्णय हे नुसते जहिरात बाजी करीत आहेत.परंतु शेतकर्यांना ते वेठीस धरत असल्याचाही आरोप आ.धस यांनी केला आहे.
Leave a comment