बीड । वार्ताहर
कोरोनाच्या निश्चित निदानासाठी आज शनिवारी (दि.27) सकाळी बीड जिल्ह्यातील 24 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते, ते सर्व निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.दरम्यान मागील चार दिवसातील सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने बीड जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बीड जिल्ह्यातून आज शनिवारी सकाळी एकूण 24 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. यात जिल्हा सामान्य रुग्णालयातून 5, बीड कोव्हीड केअर सेंटर 2, गेवराई उपजिल्हा रुग्णालय 1, केज उपजिल्हा रुग्णालय 2, परळी उपजिल्हा रुग्णालय 2, अंबाजोगाई कोव्हीड केअर सेंटर 1, अंबाजोगाई स्वाराती ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय 6 आणि आष्टी ग्रामीण रुग्णालय 5 स्वॅबचा समावेश होते. दुपारी अडीचच्या सुमारास सर्व अहवाल जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाले, ते सर्व निगेटिव्ह असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
Leave a comment