गेवराई । वार्ताहर
तालुक्यातील चव्हाणवाडी येथील शेतकरी कुटुंबातील प्रसाद कल्याणराव चव्हाण याची नुकतीच भारतीय वायूसेनेत गरुड कमांडोपदी निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
शेतकरी कुटुंबातील प्रसाद चव्हाण याने हलाखीच्या परिस्थितीतून हे यश मिळवले आहे. त्याने पहिली ते पचवी पर्यंत चे प्रथिमिक शिक्षण चव्हाणवाडी येथे व माध्यमिक शिक्षण तलवाडा व पुढील उच्च शिक्षण हे गेवराई येथील र.भ. अट्टल महाविद्यालयात पूर्ण केले व यानंतर त्याने विविध पद भरतीचा अभ्यासाला सुरुवात केली. लहानपणापासूनच देश सेवेचे स्वप्न उराशी बाळगत त्याने रात्रंदिवस मेहनत घेत हे स्वप्न पूर्णत्वास नेले आहे. यामध्ये त्याला पहिल्या प्रयत्नात थोड्या फरकाने अपयश आले मात्र खचून न जाता त्याने आपले प्रयत्न सुरू ठेवत दुसर्या प्रयत्नात त्याने यश मिळवले. या भरतीत त्याने लेखी परीक्षा,शारीरिक चाचणी,मुलाखत व चिकित्सा चाचणी असे चारही टप्पे उत्कृष्टपने पार केले होते.दरम्यान दि.9 जून रोजी या भरतीचा निकाल जाहीर झाला असून दि.16 ऑगस्ट रोजी कर्नाटक मधील बेळगाव एटीएस येथे प्रशिक्षनासाठी तो रुजू होणार आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्व ग्रामस्थ,नातेवाईक,मित्रपरिवार यासह सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
Leave a comment