19 स्वॅब अहवाल तपासणीला
बीड | वार्ताहर
जिल्ह्यातील 5 रुग्ण आज शुक्रवारी कोरोनामुक्त होत असून त्यांना रुग्णालयातून सुटी दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली. यातील 1 कोरोनामुक्त रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयातील तर अन्य चार जण केज तालुक्यातील माळेगाव येथील आहेत. दुसरीकडे शुक्रवारी (दि.26) सकाळी कोरोनाच्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील 19 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब अंबाजोगाई प्रयोगशाळेत तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
यात जिल्हा सामान्य रुग्णालयातून 5, अंबाजोगाईच्या स्वाराती ग्रामीण महाविद्यालयातून 10,आष्टी ग्रामीण रुग्णालयातून 1,माजलगाव ग्रामीण रुग्णालय- 2 आणि केज उपजिल्हा रुग्णालयात 1 स्वॅबचा समावेश आहे. दरम्यान आज सायंकाळी बीड जिल्ह्यात आज 5 जणांना कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे.आजपर्यंत जिल्ह्यात 116 बाधीत रुग्ण निष्पन्न झाले, यातील 4 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर तब्बल 91 जण बरे असून जिल्ह्यात आता 21 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Leave a comment