जिल्ह्यात 24 तासात सर्वदूर पाऊस
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात गत 24 तासात सर्वदूर कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे.गेवराई, बीड,आष्टी आणि केज तालुक्यातील काही महसुल मंडळात या पावसाचा जोर कायम राहिल्याचे दिसून आले. आष्टी आणि केज तालुक्यातील नांदूरघाट या 2 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
बीड जिल्ह्यात गुरुवारी दुपारपासूनच आभाळ भरून आले होते. दुपारी सव्वातीनच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. नंतर मध्यरात्रीही जोरदार पाऊस झाला. गत 24 तासात एकुण 16 मि.मी.पावसाची नोंद पर्जन्यमापकावर नोंद झाली आहे. यात आष्टी महसूल मंडळात 76 तर केज तालुक्यातील नांदूरघाट महसूल मंडळात 70 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय झालेल्या पावसाची आकडेवारी अशी: बीड-11.9, पाटोदा-4, आष्टी-36, गेवराई 27.01, शिरुरकासार-11, वडवणी-8, अंबाजोगाई 20.4, माजलगाव-5.7, केज-29.9, धारुर-14 आणि परळी तालुक्यात 11.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
Leave a comment