आज दोघांना मिळणार डिस्चार्ज
बीड । वार्ताहर
कोरोनाच्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील 65 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब आज बुधवारी (दि.24) सकाळी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली.
यात बीड जिल्हा सामान्य रुग्णालयातून 2 कोव्हीड केअर सेंटर बीड 34, माजलगाव ग्रामीण रुग्णालय 8, केज उपजिल्हा रुग्णालय 9, परळी उपजिल्हा रुग्णालय 2 आणि स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथून 10 व्यक्तींच्या स्वॅबचा समावेश आहे.सायंकाळ पर्यंत हे अहवाल प्राप्त होतील.
दरम्यान बीड जिल्हा रुग्णालयातून आज 2 रुग्ण कोरोनामुक्त होत असून त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी सांगितले. आजपर्यंत बीड जिल्ह्यात एकूण 116 कोरोना बाधीत रुग्ण निष्पन्न झाले. यातील 83 जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Leave a comment