गेवराई । वार्ताहर
उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. राजेंद्र चंद्रकांत राठोड यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दैदिप्यमान कामगिरी करून नायब तहसीलदार होण्याचा बहुमान मिळविला आहे. मंगळवारी (दि.23) सकाळी अकरा वाजता येथील जिजाऊ अभ्यासिका केन्दाच्या वतीने संचालक विज्ञानेश्वर गायकवाड यांनी डॉ.राठोड यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. माझ्या यशात जिजाऊ अभ्यासिकेचा वाटा असून, तालुक्यातील विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
शुक्रवारी (दि.19) लोकसेवा आयोगाचा निकाल घोषित झाला. यात बीड जिल्ह्यातील चार विद्यार्थी पोलीस उपअधीक्षक झाले आहेत. गेवराई येथील तालुक्यातील डॉ. राजेंद्र चंद्रकांत राठोड यांनी नायब तहसीलदार पदासाठी यश संपादन केले आहे.ते येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल जिजाऊ अभ्यासिका केंद्राच्या वतीने संचालक विज्ञानेश्वर गायकवाड यांनी डॉ.राठोड यांचा सत्कार केला. यावेळी रामेश्वर गायकवाड, आकाश ऐटवार,बालाजी ढाकणे यांच्या सह जिजाऊ अभ्यासिकेचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
Leave a comment