आष्टी । वार्ताहर
आष्टी येथे भाजपा आ.सुरेश धस यांच्या निवास स्थानी मोदी सरकार-2 प्रथम वर्षपूर्ती अभियान निमित्त मराठवाडा व विदर्भ विभागासाठी व्हर्चुअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये रॅलीमध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सोशल डिस्टंन्सींगचे पालन करत उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने दुसर्या कालखंडातील प्रथम वर्षाचा कालावधी यशस्वीपणे पूर्ण केला आहे.मोदी सरकार-2 प्रथम वर्षपूर्ती अभियान निमित्त मराठवाडा व विदर्भ विभागासाठी व्हर्चुअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला प्रमुख वक्ते म्हणून केंद्रीय मंत्री श्री.नरेंद्रसिंगजी तोमर संबोधित केले. केंद्र सरकारचे ऐतिहासिक निर्णय तसेच विविध लोककल्याणकारी योजनांची उपलब्धता याविषयी रॅलीद्वारे अवगत केली गेली.आष्टी येथे आ. सुरेश धस यांच्या निवासस्थानी देखील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सोशल डिस्टंन्सींगचे पालन करत मोठ्या संख्येने या व्हर्चुअल रॅलीत सहभागी झाले त्याचप्रमाणे भारताच्या आत्मनिर्भरतेची शपथ देखील घेतली यावेळी सर्व कार्यकर्तानी घेतली.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment