डोंगरकिन्ही । वार्ताहर
गलवान घाटीत भारत चिनी सीमेवर चिनी सैनिकांच्या क्रुर हल्ल्यात भारताचे वीस जवान शहीद झाले. या शहिदांना अभिवादन करण्यासाठी पाटोदा तालुक्यात गावागावात,शेत बांधावर सर्वत्र एक सामुहिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.आवाहन पाटोदा तालुक्यातील सर्व पत्रकारांनी केले होते.
मंगळवारी दि 23 रोजी सकाळी 10 वाजता नागरीकांनी जेथे आहे तेथूनच उस्फूर्त पणे प्रतिसाद देऊन श्रध्दांजली अर्पण केली आहे. तसेच चिनी वस्तु वर बहिष्कार टाकण्याची शपथ घेतली आहे.यामध्ये पाटोदा शहरातील शासकीय कार्यालये. माणुसकीची भित सेवाभावी संस्था, साईक्रांती सेवाभावी संस्था, पाटोदा तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्ते, हॉटेल,व्यापारी संघटना,भाजी विक्रेते,शेतमजुर, फळविक्रेते यांच्या तालुक्यातील कर्मचारी, व तालुक्यातील विविध कार्यालयातील कर्मचारी, शिक्षक, वृंदावन, डॉक्टर, खाजगी शाळेत, तालुक्यातील सौताडा, कुसळंब, सुप्पा, वहाली, चिकली, अंमळनेर, पांढरवाडी, कोतन, डोंगरकिन्ही , कारेगाव, सौदाना, निरगुडी, नायगाव, पिठ्ठी, वडझरी, डोमरी, धसपिंपळगाव , तगारा, पारनेर, उंबरविहिरा, तांबाराजुरी, पारगाव, धनगरजवळका, जवळाला, चुंभळी, थेरला, मुगगाव, निवडुंगा, उखंडा, महासांगवी ,पाचेगाव, भायळा ,रोहतवाडी, मंझरी,वाघाचा वाडा, वैद्यकिन्ही, वाघिरा या तालुक्यातील गावातील नागरीकांनी चीनी सैनिकांच्या क्रुर हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यासाठी दोन मिनिटे उभे राहिले, चीनी वस्तु खरेदी करणार नाही अशी स्वयं शपथ घेतली. पाटोदा तालुक्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्याची कल्पना पत्रकार दयानंद सोनवणे यांची होती त्यांस पाटोदा तालुक्यातील सर्व पत्रकारांनी पांठिंबा दर्शवुन विविधस्तरावर प्रसिध्दी केली व सहकार्य केले. डोंगरकिन्ही येथे दयानंद सोनवणे यांच्या आवाहनाला साद देत सर्व व्यवहार दोन मिनिटे स्तब्ध होते. तसेच चिनी वस्तु खरेदी करणार नाही अशी स्वयं शपथ घेतली.
Leave a comment