सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
केज । वार्ताहर
शेत नागरण्याच्या कारणावरून सहा जणांनी एकाच्या घरात घुसून कुर्हाडीने मारहाण केली. खिशातील पैसे काढून घेत घरातील वस्तूंची नासधूस केली. रविवारी (दि.21) तालुक्यातील कोठी येथे ही घटना घडली. सहा जणांवर केज ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
किसन ज्ञानोबा डोंगरे यांची कोठी येथे शेतजमीन आहे. या शेतीचा मागील बारा वर्षापासुन कोर्टात वाद चालु आहे. त्या शेतीचा निकाल किसन डोंगरे यांच्या बाजुने लागलेला आहे. रविवारी सकाळी 11:30 वा. सुमारास ते व त्यांची पत्नी शेत नांगरण्यासाठी गेले असता श्रीहरी मोहन डोंगरे, श्रीनिवास श्रीहरी डोंगरे, ऋषीकेश श्रीहरी डोंगरे, शंकर भाऊराव डोंगरे, सुखमला शंकर डोंगरे यांनी शेत नांगरण्यासाठी आलेल्या ट्रॅक्टर अडवून तुम्ही शेत कसे काय नांगरता? तुम्ही शेत नांगरायचे नाही म्हणून नांगरणी अडवली. त्यानंतर सोमवारी किसन डोंगरे हे सकाळी शेतात फेरफटका मारुन घरी येत असताना सकाळी आठच्या सुमारास गावातील चौकात श्रीहरी डोंगरे, श्रीनिवास डोंगरे, ऋषीकेश डोंगरे, शंकर डोंगरे यांनी गच्चीला याला धरुन खाली पाडुन मारहाण केली. किसन डोंगरे हे जीव वाचवण्यासाठी त्यांची दुचाकी चौकात सोडुन घराकडे पळत असतांना आरोपींनी त्यांचा पाठलाग करत दगड मारले. सहा आरोपींनी घरात घुसून शिवीगाळ केली. तसेच पोलीसांना का बोलावून घेतले? व आमच्या विरुद्ध पोलीस ठाणेला केस का करतो? असे म्हणुन श्रीहरी डोगरे याने त्याचे हातातील कुर्हाड किसन यांच्या डोक्यात मारुन दुखापत केली आणि लाथाबुक्कयाने मारहाण केली. त्याची पत्नी अलका ही भांडण सोडवण्यास आली असता तिला पण सुखमल डोंगरे व सविता डोंगरे यांनी लाथाबुक्कयाने व चापटाने मारहाण केली. तिच्या गळ्याला ओरबडुन तिचे गळ्यातील मंगळसुत्र भांडणात कोठे तरी पडले. किसन हे बेशुद्ध पडले असता खिशातील साडेचार हजार रुपये शंकर डोंगरे यांनी काढुन घेतले. तसेच घरातील टी.व्ही.फोडुन नुकसान केले. या प्रकरणी किसन डोंगरे यांच्या फिर्यादीनुसार सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक श्रीराम काळे हे पुढील तपास करीत आहेत.
Leave a comment