केज । वार्ताहर

कोरोनाचा संसर्ग रोखणे व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंधक कायदा आणि पोलीस कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी केज येथील तहसील कार्यालयावर आंदोलन करणार्‍या भाजपच्या 35 कार्यकर्त्यांवर केज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.

 

सोमवारी सकाळी 10:30 वा च्या दरम्यान केज येथे शेतकर्‍यांना पिक कर्ज तात्काळ वाटप करण्यात यावे. महात्मा ज्योतिबा फुले कर्ज मुक्ती योजने अंतर्गत शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. शेतकर्‍यांनी पेरणी केलेले सोयाबीन बियाणे उगवले नसल्यामुळे शेतकर्‍यांना दुबार पेरणी करिता नुकसान भरपाई देऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी या आणि इतर मागण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी केज तहसीलसमोर आंदोलन केले होते. जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी स्वतःच्या जीवाची व इतरांच्या जीवाची पर्वा न करता सोशल डिस्टन्सचे पालन न करता जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले आणि तहसील आवारात बेकायदेशी गर्दी जमविली म्हणून पो.कॉ. मतीन शेख यांच्या फिर्यादीनुसार भाजप तालुकाध्यक्ष भगवान केदार, नंदकिशोर मुंदडा, रमाकांत मुंडे, जिल्हा परिषदप सदस्य विजयकांत मुंडे, विष्णू घुले, सुनिल घोळवे, अजय मुळे, शरद इंगळे, राहुल गदळे, सुरेश आंधळे, गोरख गित्ते, संदीप पाटील, शिवदास थळकरी, कैलास जाधव, विठ्ठलराव शिंदे, संतोष देशमुख, बिभीषण भोसले, अविनाश साबळे, संतोष जाधव, रामराजे तांबडे, सुरेश घोळवे, अतुल इंगळे, खदिर कुरेशी, अर्जुन बनसोडे, विक्रम डोईफोडे, शशिकांत थोरात, काकासाहेब पाळवदे, पांडुरंग भांगे, धनराज साखरे, वैजनाथ तांदळे, विठ्ठल पारखे, शिवाजी भिसे, अंकुश जोगदंड, प्रकाश मुंडे आणि प्रकाश बाळमे या पस्तीस कार्यकर्त्याविरोधात भा.दं.वि. 188, 269, 270, 34 सह पोलीस अधिनियम 17 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005चे कलम 51(ब) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले. निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक महादेव गुजर तपास करीत आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.