पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याने शेतकरी हवालदील

परळी । वार्ताहर

परळी तालुक्यात मृग नक्षत्रात अनेक वर्षा नंतर दमदार पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी वेळेवर पेरणी केली खरी पण नामांकीत कंपनीने बोगस बियाणे शेतकर्‍यांना दिल्याने शेतकर्‍यांच्या अनंदावर पाणी फिरले आहे. पेरलेले बियाणे उगवले नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकर्‍यांना दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत देण्याची मागणी आता तालुक्यातील शेतकरी करत आहे.

खरीप हंगाम सन 2020 साठी तालुक्यातील शेतकर्‍यांनी ग्रीन गोल्ड, महाबीज , असा एक नाही तर अनेक नामांकित कंपनीचे बियाणे विकत नेऊन शेतात पेरले खरे पण बियाणे बोगस असल्याने ते बियाणे उगवले नाही.बियाणे उगवले नसल्यामुळे शेतकर्‍यांना दुबार पेरणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसाची जुळवा जुळव करावी लागत आहे.एका शेतकर्‍यांला एका एकरला पेरणी साठी बियाणे 2550 रुपयाचे व खत 2500 रुपये व रोजगारी 500 रुपये प्रमाणे एक्करी 6000 हजार रुपये प्रमाणे खर्च आला आहे. आता दुबार पेरणीसाठी ऐवढा खर्च येत असल्याने शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शेतकरी कंपनीवर कार्यावाही करण्याची मागणी करत आहेत तसच दुबार पेरणीसाठी एक्करी 6000 प्रमाणे आर्थिक मदत देण्याची मागणी करत आहेत.

बियाणे तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष यांच्या पथकाने मौजे मांडवा येथे भेट दिली प्रत्यक्षात शेतात येऊन झालेल्या नुकसानीची पहाणी केली बियाणे कंपनीने शेतकर्‍यांची फसवणूक केली असल्याचे प्रथमीक पाहणीत दिसून आले आहे. ज्या शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे असा सर्वांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे बियाणे खरेदी केलेली पावती झेरँक्स व अर्ज द्यावा आसा सूचना केल्या आहेत. यावेळी पथकात व्ही.एम.मिसाळ उपविभागीय कृषी अधिकारी , ए.व्ही.गुट्टे शास्त्रज्ञ मराठवाडा कृषी विद्यापीठ,ए.एस.सोनवने तालुका कृषी अधिकारी , एस.एल.कांदे कृषी विस्तार अधिकारी , व्ही.एस.जाधवर मंडळ कृषी अधिकारी,पि.डी. तिडके कृषी सहाय्यक मांडवा, ग्राम पंचायत सदस्य मोहन साखरे, धस महाबीज प्रतिनिधी, खरात ग्रीन गोल्ड कंपनी प्रतिनिधी , शेतकरी नामदेव साखरे, मधुकर साखरे,मोकिंद बोंबले, राम बोंबले आदी उपस्थित होते.दरम्यान शेतकर्‍यांनी तक्रार करताच पालकमंञी धनंजयमुंडे हे मुंबईत असल्याने बंधू अजय मुंडे यांनी तात्काळ संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले व अहवाल येताच बोगस बियाणे विक्री करणार्‍या कंपनीच्या विरोधात आपण वेळ प्रसंगी शेतकर्‍यांच्या सोबत ग्राहक मंचात जाऊ असे सांगितले आहे.तालुक्यात सर्वाधिक तक्रारी ह्या मांडवा गावातील शेतकर्‍यांच्या आहेत.दाहा वर्षाच्या नंतर चांगल पाऊस पडला.पण बोगस बियाणे शेतकर्‍यांना दिल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.बियाणे पेरले पण उगवले नाही. सद्या तक्रार निवारण समिती पंचनामे करण्याचे काम करत आहे. दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत मिळायला हवी तसेच कंपनीवर कारवाई होणे अपेक्षित आहे.तालुक्यात 22 जूनच्या अहवालानुसार 21 हजार 556 हेक्टर क्षेञावर सोयाबीनचा पेरणा झालेला आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.